Biparjoy Update News: बिपरजॉय वादळ गुरुवारी (15 जून) रात्री 11.30 च्या सुमारास गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर धडकले. जखाऊ आणि मांडवीसह कच्छ आणि सौराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आता हे वादळ राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. याठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 75 ते 85 किलोमीटर इतका आहे. (Latest Marathi News)
या वादळामुळे आज (१६ जून) आणि उद्या (१७ जून) गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली (New Delhi) आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडेल. कच्छमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (Cyclone News)
अनेक झाडे व विजेचे खांब पडले
कच्छ जिल्ह्यातील जखाऊ आणि मांडवी शहरांजवळ अनेक झाडे आणि विद्युत खांब उन्मळून पडले, तर घराच्या बांधकामात वापरल्या जाणार्या टिनपत्रे उडून गेली. द्वारका येथे झाडे पडल्याने तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गुजरात पोलिस, राष्ट्रीय आपत्ती दल आणि लष्कराच्या पथकांनी द्वारकाच्या विविध भागात पडलेली झाडे आणि विजेचे खांब हटवण्याचे काम सुरू ठेवले आहे.
लष्कराने भुज, जामनगर, गांधीधाम तसेच नलिया, द्वारका आणि मांडवी येथे 27 मदत स्तंभ तैनात केले आहेत. हवाई दलाने वडोदरा, अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी एक हेलिकॉप्टर तयार ठेवले आहे. नौदलाने बचाव आणि मदतीसाठी ओखा, पोरबंदर आणि बकासूर येथे प्रत्येकी पाच गोताखोर आणि उत्तम जलतरणपटूंचा समावेश असलेल्या १०-१५ टीम्स तैनात केल्या आहेत.
99 गाड्या रद्द
गुजरातमधील अनेक जिल्ह्यांची स्थिती दयनीय आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम वलसाडमध्येही दिसून येत आहे. गुजरातमधील गीर सोमनाथमध्येहो एक घर कोसळले, तर अनेक घरांचे मोठे नुकसान झाले.
बिपरजॉयचा परिणाम रेल्वे सेवेवरही दिसून आला आहे. 18 जूनपर्यंत प्रभावित भागात 99 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गुजरातचे मदत आयुक्त आलोक पांडे यांनी सांगितले की, वादळामुळे आतापर्यंत 22 लोक जखमी झाले असून 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.