Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर; गुजरातमध्ये 22 जण जखमी, 23 जनावरांचा मृत्यू, 940 गाव अंधारात

Cyclone Biparjoy News: बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, राजस्थानलाही सतर्कतेचा इशारा
Cyclone Biparjoy
Cyclone BiparjoySaam Tv
Published On

Cyclone Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. ताशी तब्बल 145 किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या वादळामुळे 22 जण जखमी झाले याशिवाय गुजरातमध्ये विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 524 हून अधिक झाडे आणि विजेचे खांब पडले आहे. त्यामुळे सुमारे 940 गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला.  (Latest Marathi News)

Cyclone Biparjoy
Mumbai News: धर्माची भिंत तोडून माणुसकी जिंकली! ऑटो चालकाने वाचवले पेटलेल्या महिलेचे प्राण

बिपरजॉय वादळ (Cyclone) किनारपट्टीवर धडकताच गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहू लागले यासोबतच त्याठिकाणी जोरदार पाऊस (Rain) झाला. अनेक मदत आणि बचाव पथके सतर्क असून गुजरातमधील (Gujarat) हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वादळ जवळ येताच गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीवर ताशी 120 किमी वेगाने वारे वाहू लागले आणि जोरदार पाऊस झाला.

गुजरातचे मदत आयुक्त आलोक सिंह म्हणाले, "वादळामुळे सुमारे 22 लोक जखमी झाले आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अरबी समुद्रात अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या बिपरजॉय या चक्रीवादळाने गुजरातच्या किनारी भागात धडक दिली आहे. त्यामुळे रेल्वे सेवेवरही याचा परिणाम झाला आहे. 

जवळपास 99 रेल्वे (Railway) गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत 74 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नुकसान झालेल्या भागात NDRF चं मदतकार्य सुरु आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सतत या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून किनारी भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com