Cyber attack in israel  Saam tv
देश विदेश

Cyber attack in israel : अर्ध्या रात्री अचानक फोनची रिंग वाजताच लोक घर सोडून पळाले, इस्त्रायलमध्ये नेमकं काय घडतंय?

israel Cyber attack update : लेबनॉननंतर आता इस्त्रायलमधील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. अर्ध्या रात्री अचानक फोनची रिंग वाजताच लोक घर सोडून पळाल्याची माहिती हाती आली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : लेबनॉनमध्ये पेजर हल्ला झाल्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशी पेजरनंतर वॉकी-टॉकींचेही स्फोट झाले. यामुळे लोकांमध्ये दहशत पसरली आहे. लेबनॉनमध्ये भीषण हल्ला झाल्याची घटना ताजी असताना इस्त्रायलमध्येही सायबर हल्ला झाल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. लोकांच्या घरात फोन वाजताच ते घाबरून पळू लागले आहेत. इस्त्रायलने या हल्ल्यामागे इराणचं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

'लाईव्ह हिंदुस्तान'च्या रिपोर्टनुसार, इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये ८ ऑक्टोबर २०२३ मध्ये युद्ध सुरु झालं होतं. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आहेत. मागील दोन दिवसांपासून लेबनॉनमध्ये (Lebanon) पेजर आणि वॉकी-टॉकीच्या स्फोटाची दहशत पसरली आहे. पेजर आणि वॉकी-टॉकीचा स्फोट झाल्याने आतापर्यंत ३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३ हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे इस्त्रायलचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या हल्लानंतर लेबनॉनमधील दहशतवादी हिजबुल्लाह संघटनेने बदला घेणार असल्याची धमकी दिली आहे.

लोकांचं म्हणणं आहे की, 'अर्ध्या रात्री फोन वाजतो. फोन उचलल्यानंतर कोणाचा आवाज येत नाही. मात्र, फोनची रिंग पुन्हा वाजल्यानंतर त्याचा स्फोट होण्याची भीती वाटते. या भीतीमुळे अनेक जण त्यांचं घर सोडून पळून गेले आहेत. यामागे इराणचं (iran) षडयंत्र अस असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे हिजबुल्लाह यांनी हा बदला घेतल्याचं बोललं जात आहे. लोकांचे फोन वाजले. त्यानंतर इमरजेंसी अलर्टचा मेसेज आला. या प्रकारानंतर तपास सुरु झाला आहे. मात्र, मध्य आशिया देशात होणाऱ्या वाढत्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीती वाढली आहे.

दरम्यान, इस्त्रायल आणि हमासमधील युद्धादरम्यान लेबनॉनची राजधानी बेरुत पेजर स्फोटात ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३००० लोक जखमी झाले आहेत. पेजरनंतर वॉकी-टॉकींचे स्फोट झाल्यानंतर खळबळ उडाली होती. राजधानी बेरुतमधील अनेक भागात वॉकी-टॉकींचे स्फोट झाले आहेत. यात कमीत कमी ३ जणांचा मृत्यू तर १०० जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

SCROLL FOR NEXT