Petrol Diesel Price Today, Inflation news in Marathi
Petrol Diesel Price Today, Inflation news in Marathi Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत १० टक्क्यांपर्यंत घट; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जागतिक तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. अशातच सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले आहेत. आजच्या दरानुसार कंपन्यांना दीर्घ काळानंतर ब्रेंट क्रूड जागतिक बाजारात ११० डॉलरपेक्षा स्वस्त झालं आहे.

जागतिक बाजारात, ब्रेंट क्रूडची किंमत आज सकाळी प्रति बॅरल १०९.७ डॉलर अशी आहे तर US क्रूड WTI ची किंमक प्रति बॅरल सुमारे १०४ डॉलर अशी आहे. सरकारी तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर दिलासा मिळाला असला तरिही आज या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले असून दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

हे देखील पाहा -

दरम्यान, एप्रिल महिन्यापासून देशांतर्गत बाजारामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्ये वाढ झालेली नाही. मात्र, क्रूडने गेल्या आठवड्याच्या उच्चांकापेक्षा सुमारे १० % घसरण केली आहे. त्यामुळे आता तेलांच्या किंमती घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशभरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय ?

महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत (Mumbai) पेट्रोल १११.३५ रुपये तर डिझेल ९७.२८ रुपये प्रति लिटर. दिल्लीमध्ये पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर तसंच चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर, असे दर आहेत.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

-SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासीठ इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Leader Avinash Jadhav: सराफ व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितले? मनसे नेते अविनाश जाधवांनी आराेप फेटाळले

Rahul Gandhi News: पराभवाची भिती की रणनिती? राहुल गांधींनी अमेठी मतदार संघ का सोडला? वाचा काँग्रेसच्या खेळीची इनसाईड स्टोरी

Today's Marathi News Live : ठाणे लोकसभेतून नरेश म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज भरला

Thane MNS News | मनसेच्या नेत्याने मागितली खंडणी? पोलिसांकडून गुन्हा दाखल

New Force Gurkha: ऑफ-रोडींगसाठी आहे बेस्ट! पॉवरफुल Force Gurkha भारतात लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT