CRPF Jawan Arrested For Allegedly Spying  X
देश विदेश

संतापजनक! CRPF जवानानंच केली गद्दारी; २ वर्षांपासून पाकिस्तानसाठी हेरगिरी, अत्यंत संवेदनशील माहिती शेअर केल्याचं उघड

CRPF Jawan Arrested For Allegedly Spying : एनआयएने एका सीआरपीएफ जवानाला अटक केली आहे. या जवानावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. दिल्लीतून जवानाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Yash Shirke

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएकडून सीआरपीएफ जवान मोती राम जाट याला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान गुप्तचर अधिकाऱ्यांना संवदेनशील माहिती लीक केल्याचा आरोप जवान मोती राम जाटवर करण्यात आला आहे. २०२३ पासून तो हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे म्हटले जात आहे.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) दिलेल्या माहितीनुसार, जवान मोती राट हा २०२३ पासून पाकिस्तानी हँडलर्सना राष्ट्रीय सुरक्षेची गोपनीय माहिती शेअर करत होता. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. गोपनीय माहितीच्या बदल्यात त्याला विविध माध्यमांद्वारे निधी मिळत असल्याचे एनआयएने म्हटले आहे.

पाकिस्तानला देशातील संवदेशनील आणि गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी जवान मोती राम जाटला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सध्या त्याची चौकशी सुरु आहे. पाटियाला हाऊस येथील विशेष न्यायालयासमोर त्याला सादर करण्यात आले. न्यायालायने त्याला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

ऑपरेशन सिंदूर या भारताच्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही अटक झाली असल्याचे म्हटले जात आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ नष्ट केले होते. त्यानंतर तपास संस्थांनी पाकिस्तानसाठी भारतात हेरगिरी करण्यात्या आरोपाखाली अनेक व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. यात यूट्यूबर ज्योती मल्होत्रा, ज्योती मल्होत्रा, नोमान, देवेंद्र, अरमान यांच्यासह आणखी काहींचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT