Punjab Police officials investigate the spot where ASI Joga Singh was shot dead in Amritsar. 
देश विदेश

पोलीस दलात खळबळ! ड्युटीवर जाणाऱ्या ASI ची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या; नेमका वाद काय?

ASI Joga Singh news : अमृतसरमध्ये ड्युटीवर जाणाऱ्या एएसआय जोगा सिंग यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाब पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

ASI murder case, Punjab Police : ड्युटीवर जाणाऱ्या एएसआयची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमृतसरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर पंजाब पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे. मृत पोलिसाचे नाव जोगा सिंह असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास केला जात आहे. जोगा यांच्यावर पूर्वनियोजित कट करून हल्ला केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळी ड्युटीवर जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी सहायक उपनिरीक्षक (एएसआय) जोगा सिंग यांची गोळ्या झाडून हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय जोगा सिंग सकाळी ड्युटीवर जाण्यासाठी घरातून निघाले होते. पण वाटेतच काही अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी कोणताही वाद अथवा चर्चा न करता थेट गोळीबार केला. त्यानंतर जोगा सिंग जमिनीवर कोसळले. आजूबाजूचे लोकांचे लक्ष जाण्याआधीच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

या धक्कादायक घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ पोलीस आणि रुग्णवाहिकेला याबाबत माहिती दिली. जोगा सिंग यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एएसआयच्या मृत्यूच्या बातमीने पंजाब पोलीस दलात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी परिसर सील केला आणि तपास सुरू केला.

फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळावर बोलवणयात आले आहे. पंचनामा करून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. आरोपींना ओळखण्यासाठी पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासात आहेत. हल्लेखोरांना लवकरच अटक केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी काही पथके रवाना केली असून तपास वेगात होत आहे. जोगा सिंग यांची हत्या का झाली? याचा शोधही पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर,कार, दुचाकीची एकमेकांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Sunday Horoscope : व्यवसायात लाभ होणार; ५ राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Acidity : ॲसिडीटीमुळे जुलाब होतायेत? स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ ठरेल वरदान, पोटातील गडबड झटक्यात होईल गायब

Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये नको ते बरळणाऱ्या सेजल पवार आधी FIR दाखल, आता KEM कॉलेजकडून मोठी कारवाई

Maharashtra News Live Update : बालगंधर्वमधील शोकसभेमुळे नागरिक संतप्त; नाटकाला उशिर होत नाट्य प्रेमी संतापले

SCROLL FOR NEXT