Crime News  saam tv
देश विदेश

Crime News : मार्कशीटसाठी मुख्याध्यापीकेला जिवंत जाळले, अंगावर शहारा आणणारी घटना

Crime News : मार्कशीट न दिल्याने विद्यार्थ्याने कॉलेजच्या प्राचार्याला पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Chandrakant Jagtap

Crime News : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मार्कशीट न दिल्याने कॉलेजच्या एका माजी विद्यार्थ्याने प्राचार्याला पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेच्या पाच दिवसांनंतर उपचारादरम्यान प्राचार्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी माजी विद्यार्थ्याला वारंवार सांगूनही तो मार्कशीट घेण्यासाठी येत नसल्याचे कॉलेजने म्हटले आहे. तसेच प्राचार्याच्या मुलीने खुलासा केला आहे की, हल्ल्यापूर्वी आरोपीने व्हॉट्सअॅपवर अनेक वेळा मेसेज पाठवून धमकी दिली होती. याबाबत अनेकवेळा पोलिसांकडे तक्रारी करूनही कारवाई झाली नाही, असे देखील तिने सांगितले.

पोलीस अधीक्षक (ग्रामीण) भागवत सिंह विरदे यांनी सांगितले की, सिमरोल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बीएम कॉलेज ऑफ फार्मसीचा माजी विद्यार्थी आशुतोष श्रीवास्तव (२४) याने 20 फेब्रुवारी रोजी प्राचार्या डॉ. विमुक्ता शर्मा (५४) यांच्यावर कॉलेज कॅम्पसमध्ये पेट्रोल टाकून पेटवून दिले.

सुमारे 80 टक्के भाजलेल्या विमुक्ता हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच दिवसांपासून जीवन-मरणाची लढाई लढत होत्या. सर्व प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचूव शकलो नाही. आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी ही घृणास्पद घटना घडवून आणल्याबद्दल आरोपीविरुद्ध कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पीडितेच्या विधानाच्या आधारे आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मृत्यूनंतर कलम 302 (हत्या) त्यात जोडण्यात आले आहे. (Crime News)

विरदे यांनी सांगितले की, 'आमच्याकडे आरोपींविरुद्ध ठोस पुरावे, साक्षीदार आणि महिला प्राचार्याचे मृत्यूपूर्वीची ग्वाही आहे. हा खटला विशेष न्यायालयात चालवावा अशी विनंती आम्ही करणार आहोत. त्याला न्यायालयाकडून फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : गुरुजी, आमच्या शाळेतून जाऊ नका ना! म्हणत विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला | पाहा VIDEO

Pune Crime: मंदिरात घेऊन गेला, मंत्रोच्चार करत अघोरी विधी; अंगाऱ्याचा पेढा खायला दिला, नंतर महिलेसोबत...

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला

Crime News : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती, विवाहानंतर दोन महिन्यांतच सासरकडून छळ, तरुणीचा मृत्यू

Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये जोरदार हाणामारी, बुक्क्यांनी एकमेकांना फोडलं |VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT