Aurangabad News : संभाजीनगरकरांनो सावधान! रस्त्यावर थुंकलात तर खावी लागेल जेलची हवा, आकारला जाईल दंड

Aurangabad News : येत्या 26, 27 आणि 28 फेब्रुवारीला 150 देशातील विदेशी पाहुणे शहरात येणार आहेत.
Aurangabad News
Aurangabad News saam tv

Aurangabad News : जी20 परिषदेसाठी संभाजीनगर शहर सज्ज झालं आहे. येत्या 26, 27 आणि 28 फेब्रुवारीला 150 देशातील विदेशी पाहुणे शहरात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सजवण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे. रस्ते देखील चकाचक करण्यात आले असून अनेक ठिकाणी लायटिंग लावण्यात आली आहे.

Aurangabad News
Kasba By Election : पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी भाजप-मविआची रणनीती ठरली! असे असेल बुथ मॅनेजमेंट

औरंगाबाद शहराच्या या सुशोभिकरणासाठी प्रशासनाने सुमारे 50 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. त्यामुळे यापुढे या सौंदर्यकरणाचा कुणी विद्रुपीकरण केले तर त्याला ते महागात पडणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास किंवा थुंकल्यास नागरिकांना दंड तर भरावाच लागेल मात्र जेलची हवा देखील खावी लागू शकते. (Latest Marathi News)

Aurangabad News
Maharashtra Politics: कुपोषित बालकासोबत मैत्री करून काय फायदा; गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

याशिवाय शहराचं विदृपीकरण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. त्यामुळे कोणी शहराचे विद्रूपीकरण केले तर त्याला जेलची हवा खावी लागेल शिवाय दंडही भरावा लागेल. (Sambhajinagar News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com