Kasba By Election : पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी भाजप-मविआची रणनीती ठरली! असे असेल बुथ मॅनेजमेंट

Kasba By Election : कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
Kasba By Election
Kasba By Electionsaam tv
Published On

Kasba By Election : कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचार केल्यानंतर आता भाजप आणि महाविकास आघाडीसह सर्व पक्षांसमोर मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याचे आव्हान आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी मायक्रो प्लॅनिंगला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने जास्तीत जास्त मतदान खेचण्यासाठी एका बुथवर ३० कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे, तर काँग्रेस देखील प्रत्येक बुथवर वरिष्ठ पदाधिकारी नेमून मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भर देणार आहे. काही तासांवर आलेल्या या पोटनिवडणुकीच्या अवघड पेपरसाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहे.

कसब्यात प्रमुख लढत भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात होत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात ७६ ठिकाणी २७६ बूथ आहेत आणि २ लाख ७५ हजार ६७९ मतदार आहेत. (Latest Marathi News)

Kasba By Election
Maharashtra Politics: कुपोषित बालकासोबत मैत्री करून काय फायदा; गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

भाजपचं मायक्रो प्लॅनिंग

कसब्यातील मतदान आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने प्रत्येक बुथला म्हणजे एक हजार मतदारांच्या मागे ३० कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. तसेच त्यांना मतदारांना भेटून मतदानासाठी आणण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांच्या बाहेर भाजपचा बूथ असणार आहे. तेथे लॅपटॉप, प्रिंटरची सुविदा असेल. ज्या मतदारांकडे स्लीप नसेल त्यांना ही ती पुरवली जाणार आहे. (Latest Political News)

पोलिंग एजंट आणि त्याला रिलिव्हरची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. दोन मतदार याद्या, पेन, पेन्सील, खोडरबर असे साहित्य या बूथ कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. भाजपने मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यापासून ते मतदान केंद्रातील पोलिंग एजंटपर्यंत सुमारे ७ हजार कार्यकर्ते नेमले आहेत.

Kasba By Election
Sonia Gandhi: सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, रायपूर अधिवेशनात केली घोषणा

काँग्रेसचंही सूक्ष्म नियोजन

मतदानाच्या नियोजनाबाबत काँग्रेसनेही सूक्ष्म नियोजन केले आहे. काँग्रेसने ८० मतदान केंद्राची जबाबदारी एका वरिष्ठ नेत्यांकडे दिली आहे. ते संबंधित केंद्राची आणि सर्व कार्यकर्त्यांची व्यवस्था पाहणे, मतदान करून घेणे, अडचणी आल्यावर सोडवणे याकडे लक्ष देतील. तसेच मतदान केंद्रावर गेलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणचा फोटो पाठवून तो बूथवर असल्याचे रिपोर्टींग करावे लागणार आहे.

याशिवाय दर तीन तासांनी बूथवर किती मतदान झाले, किती राहिले याचा अहवाल बुथ कार्यकर्ते या प्रमुख नेत्याला पाठवणार आहेत. या सर्वांवर काँग्रेस भवनमधून नियंत्रण ठेवले जाणार आहे. तसेच काही गडबड झाली तर थेट काँग्रेस भवन येथे त्याची माहिती देण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.नारायण पेठ, सदाशिव पेठ या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्यासाठी असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com