Sonia Gandhi: सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, रायपूर अधिवेशनात केली घोषणा

Sonia Gandhi: रायपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे.
Sonia Gandhi will not contest Lok Sabha elections
Sonia Gandhi will not contest Lok Sabha electionsANI
Published On

Sonia Gandhi: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. रायपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे. सोनिया गांधींची या घोषणेमुळे त्या राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत देत आहेत.

रायपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला संबोधित करताना काग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी मोठी घोषणा केली आहे. गेली काही वर्षे सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणात फारशा सक्रीय नाहीत. त्यानंतर आता त्यांनी ही घोणा केल्यामुळे त्या राजकारणातून देखील निवृत्त होतील असे मानले जात आहे.

Sonia Gandhi will not contest Lok Sabha elections
Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, 'मी पुराव्याशिवाय...'

सोनिया गांधी यांनी रायपूरच्या काँग्रेस अधिवेशनात भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, सरकार घटनात्मक मूल्ये चिरडत असून संवैधानिक संस्था आरएसएस-भाजपच्या ताब्यात आहेत. आजचा काळ देश आणि काँग्रेससाठी आव्हानात्मक आहे. दलित, अल्पसंख्याक, महिलांवर अत्याचार होत असून सरकार काही उद्योगपतींना पाठबळ देत आहे.

यावेळी सोनिया यांनी भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत काँग्रेसशी जनतेचा संबंध जिवंत झाल्याचे सांगितले. सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेसने लोकशाही मजबूत केली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आपण चांगले सरकार दिले असे म्हणत सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंह यांच्या कार्याचे कौतुक केले

Sonia Gandhi will not contest Lok Sabha elections
Kasba Bypoll Election : रवींद्र धंगेकर यांचं 5 तासानंतर उपोषण मागे; कसबा मतदारसंघात नेमकं काय घडलं?

या अधिवेशनाला संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. राहुल गांधींमुळे खडतर प्रवास शक्य झाला. त्यामुळे काँग्रेसचा जनतेशी असलेला संबंध जिवंत झाला आहे. काँग्रेसने देशाला वाचवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे.

काँग्रेस देशाच्या हितासाठी लढणार आहे. तगडे कार्यकर्ते ही काँग्रेसची ताकद आहे. शिस्तीने काम करायला हवे. आमचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे. वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून त्यागाची गरज आहे, असे आवाहन त्यामनी उपस्थित सदस्यांना केले. पक्षाचा विजय हा देशाचा विजय असेल आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली आपण यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com