Pune: कसब्याचं राजकारण तापलं! धंगेकरांविरोधात भाजप आक्रमक; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

धंगेकरांनी आचारसंहितेचा भंग केला, अशी तक्रारही भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
Kasaba Peth By Election 2023
Kasaba Peth By Election 2023Saamtv
Published On

Kasaba by Election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची वेळ संपली असली तरी राजकीय घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीत. या पोटनिवडणुकीत भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांसमोर पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला होता.

याच आरोपांवरुन त्यांनी आज कसबा गणपतीसमोर उपोषण पुकारले. अखेर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. पण त्यांच्या या उपोषणानंतर भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. (Kasba Peth By Election)

Kasaba Peth By Election 2023
Accident News: क्लासला जाताना अपघात, बसखाली चिरडून १२ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दुर्देवी घटनेने मिरजमध्ये हळहळ...

धंगेकरांकडून आचार संहितेचा भंग..

भाजपचं शिष्टमंडळ पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला आले. या शिष्टमंडळाने रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी प्रचाराची वेळ संपलेली असताना खोटे आरोप करत आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार केला. याशिवाय त्यांनी आचारसंहितेचा भंग केला, अशी तक्रारही भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

महाविकास आघाडीकडून होणार बोगस मतदान?

तसेच कसब्यामध्ये बोगस मतदान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवारामार्फत सुरु आहे. जिथे बोगस मतदानाची तयारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केलेली आहे. त्याठिकाणी अधिकचा पोलीस बंदोबस्त लावला पाहिजे. तिथे कुठल्याही पद्धतीत बोगस मतदान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असेही भाजप नेत्यांनी सांगितले आहे.

Kasaba Peth By Election 2023
Maharashtra Politics: कुपोषित बालकासोबत मैत्री करून काय फायदा; गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

दरम्यान, काल पाच वाजता प्रचाराचा वेळ संपला. पण तरीही केवळ उपोषणाचा बनाव करुन एकप्रकारे निवडणुकीचा प्रचार करण्यात आला. महाविकास आघाडीच्या उमेदवारावर कारवाई झाली पाहिजे. निवडणूक अर्ज रद्द झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार करणार आहोत, असेही भाजपाच्या शिष्टमंडळाने सांगितले आहे. त्यामुळे कसब्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com