Madhya Pradesh News Saam Tv
देश विदेश

Heartbreaking Story : मुलीचा संसार पत्त्यांसारखा कोसळला, जावयाने पाठवलेली नोटीस वाचून सासऱ्याला हार्ट अटॅक

Madhya Pradesh News : मुलीच्या घटस्फोटाची नोटीस वाचून वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून मुलीने नवऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

मध्य प्रदेशातील भोजपूर येथे मुलीच्या घटस्फोटाची नोटीस मिळाल्याने वडिलांचा मृत्यू

मुलीच्या संसार मोडल्याची बातमी ऐकून वडील भावनिक धक्क्याने कोसळले

डॉक्टरांच्या मते, वडिलांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला

मुलीने नवऱ्यावर गुन्हा दाखल करून न्यायाची मागणी केली आहे

एका वडिलांसाठी त्यांची मुलगी खूप लाखमोलाची असते. वडिलांचं कर्तव्य बजावताना एक बाप आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. अगदी मुलीवर संकट आलं तरी वडिलांचा जीव कासावीस होतो. लहानपणी मुलीने पत्त्यांचा बंगला बांधताना जर तो पडला तर मुलीला जितकं दुःख होत तितकंच दुःख एका बापाला होतं. मग आपल्या मुलीचा संसार मोडत असताना एखाद्या वडिलांनी पहिला तर तो क्षण त्यांच्यासाठी किती दुःखदायक ठरू शकते हे कल्पनेच्या पलीकडेच आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील भोजपूर शहरात घडली आहे. आईवडिलांच्या घरी राहणाऱ्या एका महिलेला तिच्या पतीने पोस्टाद्वारे घटस्फोटाची नोटीस पाठवली. ही नोटीस पाहून मुलीचे वडील हैराण झाले. ही नोटीस पाहताच मुलीचे वडील क्षणार्धात जमिनीवर कोसळले.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील भोजपूर येथे एक लग्न झालेली मुलगी तिच्या सासरचं घर सोडून तिच्या आई वडिलांकडे राहण्यासाठी आली होती. काही दिवसांनी पतीने बायकोच्या माहेरी थेट पोस्टाने घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. पोस्टमनने ही नोटीस मुलीच्या वडिलांच्या हातात दिली.

पोस्टातून आलेला दस्तऐवज हा मुलीचा संसार मोडणारा कागद असावा हे त्या निष्पाप वडिलांना ठाऊकच नव्हतं. दरम्यान वडिलांनी हातात मिळालेल्या पोस्टाच्या कागदाला फाडून त्यात काय आहे ते पाहिलं. काही अक्षर वाजताच त्यांना ते मुलीच्या घटस्फोटाची नोटीस असल्याचं समजलं. काही क्षण मुलीच्या वडिलांना काय करावं हे समजलंच नाही. मुलीच्या काळजीने भावुक झालेले वडील ही बातमी ऐकून हादरले. आणि क्षणार्धात खाली कोसळले.

पोस्टातून आलेला दस्तऐवज हा मुलीचा संसार मोडणारा कागद असावा हे त्या निष्पाप वडिलांना ठाऊकच नव्हतं. दरम्यान वडिलांनी हातात मिळालेल्या पोस्टाच्या कागदाला फाडून त्यात काय आहे ते पाहिलं. काही अक्षर वाजताच त्यांना ते मुलीच्या घटस्फोटाची नोटीस असल्याचं समजलं. काही क्षण मुलीच्या वडिलांना काय करावं हे समजलंच नाही. मुलीच्या काळजीने भावुक झालेले वडील ही बातमी ऐकून हादरले. आणि क्षणार्धात खाली कोसळले.

या घटनेनंतर मुलीच्या वडिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. या घटनेनंतर मुलीने वडिलांच्या मृत्यूला तिचा नवरा जबाबदार असल्याचं तिने म्हटलं आहे. दरम्यान मुलीने नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईसह ५ महापालिकेत ठाकरे बंधूंची युती, २ दिवसात घोषणा, उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने सगळं सांगितलं, वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना e-KYC केली तरीही ₹१५०० कायमचे बंद होणार, नेमकं कारण काय? समोर आली अपडेट

Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक...अत्यंत धोकादायक आणि न समजून येणारी लक्षणं, काय आहेत जाणून घ्या

Marathi Movie Teaser: 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'; निर्मिती सावंत - प्रार्थना बेहेरे उलगडणार सासू-सुनेचं खट्याळ नातं, पाहा VIDEO

Tamarind Pickle Recipe : आंबट गोड चिंचेचे लोणचे, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल

SCROLL FOR NEXT