Moringa Leaves Chutney Recipe: कडू वाटली तरी पौष्टिक! उन्हाळ्यात सोप्या पद्धतीने बनवा शेवग्याच्या पानांची झणझणीत चटणी

Manasvi Choudhary

शरीरासाठी फायदेशीर

उन्हाळ्याच्या दिवसात शरीरासाठी असे काही पदार्थ खाल्ले पाहिजे जे केवळ चवच नाही तर शरीरासाठी फायदेशीर देखील असतील.

foods in summer

शेवग्याच्या पानांची चटणी

यासाठी आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहे.

Moringa Leaves Chutney Recipe

असा होतो फायदा

शेवग्याच्या पानांची चटणी ही पौष्टिक असते. शरीरातील कॅल्शियम, व्हिटॅमिन सी कमी झाल्यास या चटणीचे सेवन तुम्ही करू शकता.

Moringa Leaves Chutney Recipe

चवीला कडू चटणी

शेवग्याच्या पानांची चटणी चवीला कडू असल्याने अनेकजण खाणे टाळतात मात्र उन्हाळ्यात या चटणीचे सेवन गुणकारी असते.

Moringa Leaves Chutney Recipe

साहित्य

शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी शेवग्याची पाने, चणाडाळ, उडीद डाळ, कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे, जिरा, हिंग, चिंच, मीठ, तूप हे साहित्य एकत्र करा.

Moringa Leaves Chutney Recipe | GOOGLE

डाळ परतून घ्या

शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी गॅसवर पॅनमध्ये तूप घाला. नंतर यात चणाडाळ आणि उडीद डाळ परतून घ्या.

Chana Dal

भाज्या मिक्स करा

डाळ परतून झाली की त्यात, कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे, हिरवी मिरची, लाल मिरची, जिरा आणि हिंग मिक्स करा.

spices | yandex

शेवग्याची पाने धुवून टाका

हे संपूर्ण मिश्रण चांगले परतून घ्या. नंतर यात शेवग्याची पाने धुवून टाका. मिश्रणात मीठ मिक्स करून तुम्ही संपूर्ण मिश्रण चांगले शिजवून घ्या. मिश्रण कोरडे होणार नाही याची काळजी घ्या.

Moringa Leaves | GOOGLE

शेवग्याच्या पानांची चटणी तयार

नंतर हे मिश्रण थंड करा आणि मिक्सरच्या भाड्यांमध्ये बारीक करा. अशाप्रकारे घरच्या घरी शेवग्याच्या पानांची चटणी तयार होईल.

Moringa Leaves Chutney Recipe

next: Moringa Powder Benefits For Hair: लांब आणि दाट केसांसाठी शेवग्याच्या पानांचे फायदे, घरीच करा सोप्या पद्धतीने वापर

Moringa Powder Benefits For Hair
येथे क्लिक करा...