Indian Cricketer Smriti Mandhana Cancels Marriage Saam
देश विदेश

मोठी बातमी! स्मृती मानधनाचं लग्न मोडलं, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती

Indian Cricketer Smriti Mandhana Cancels Marriage: भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिचा आणि पलाश मुच्छल यांचा विवाहसोहळा रद्द झाल्याचं जाहीर केलं.

Bhagyashree Kamble

भारतीय क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने विवाहसोहळा रद्द झाल्याची माहिती दिली आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल या दोघांचे लग्न ठरले होते. ६ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार होते. मात्र आता हा विवाहसोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

स्मृतीनं स्वतः आपल्या चाहत्यांना ही माहिती दिलीये. तिनं इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत अधिकृतपणे हा निर्णय जाहीर केलाय. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं असून, ही पोस्ट व्हायरल होत आहे.

स्मृतीनं इन्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं की, 'गेल्या आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक अनेक अंदाज लावले जात आहेत. त्यामुळे मला आता स्वत:बद्दल बोलणं महत्त्वाचं वाटत आहे. मी स्वभवानं अत्यंत खासगी जीवन जगणारी व्यक्ती आहे. पुढेही तसेच जगू इच्छिते. मात्र, एक गोष्ट मला आता स्पष्ट करायची आहे. लग्नाचा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे'.

'या विषयाला आता इथेच पूर्णविराम देऊ इच्छित आहे. तुम्ही सर्वांनीही याचप्रमाणे हे प्रकरण इथेच थांबवावे, अशी विनंती आहे. कृपया दोन्ही कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा. आम्हाला पुढे जाण्याची मोकळीक द्या', असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Cricketer Smriti Mandhana Cancels Marriage

'माझ्या आयुष्याला नेहमीच एका मोठ्या उद्दिष्टाने दिशा दिलेली आहे. माझ्या देशाचं सर्वाच्चा पातळीवर प्रतिनिधित्व करणं, भारतासाठी खेळणं, जिकणं आणि देशासाठी नवीन शिखर गाठणं, हेच माझ्यासाठी कायमस्वरूपी ध्येय राहिलं आहे. पुढे देखील माझं लक्ष कायम त्यावरच केंद्रीत राहिल', असंही स्मृतीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

२३ फेब्रुवारीला स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल लग्नबंधनात अडकणार होते. संगीत कार्यक्रम झाल्यानंतर स्मृतीच्या वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे दोघांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर चर्चेला उधाण आलं. आता स्मृतीच्या पोस्टमधून थेट लग्न मोडल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेना नकोच! जिल्हा परिषद निवडणुकीआधी जोरदार राडा, भाजप कार्यकर्त्यांचा मंत्री, आमदारांना घेराव घालण्याचा प्रयत्न

Homemade Pizza Recipe: वीकेंडला घरी करा स्पेशल पिझ्झा पार्टी, अगदी रेस्टॉरंटस्टाइल येईल चव

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये ईव्हीएमविरोधातील आंदोलन पेटलं! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर पेटवली

Maharashtra Politics: भाजप-ठाकरे गटाची युती होणार? भाजपची शिवसेनेला नवी 'ऑफर', नेत्यांच्या गुप्त भेटी सुरू

शिक्षक ते BMC नगरसेवक! उमेदवारी अर्ज भरायला खिशात पैसा नव्हता; ओवैसींनी ताकद दिली, तरुणाने निवडणूक जिंकून दाखवली

SCROLL FOR NEXT