Covid JN.1 Variant cases saam tv
देश विदेश

Covid JN.1 Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा तब्बल ११ राज्यांमध्ये शिरकाव; अशी लक्षणे दिसल्यास सतर्क व्हा!

Covid JN.1 Variant cases: कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट ‘जेएन.१’ ने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत तब्बल ११ राज्यांमध्ये व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत.

Satish Daud

कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट ‘जेएन.१’ ने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत तब्बल ११ राज्यांमध्ये व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात JN.1 च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असं आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग दरम्यान देशात JN.1 व्हेरिएंटचे ४ रुग्ण आढळून आले होते. हा आकडा आठवडाभरातच १७ वर गेला. याचा अर्थ असा की हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत किंवा अगदी तिसऱ्या व्यक्तीपर्यंत झपाट्याने पसरतो. (Latest Marathi News)

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) ने देखील आरोग्य मंत्रालयाला एक अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की JN.1 संसर्ग देशातील ११ राज्यांमध्ये पोहोचला आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त गोवा, पुद्दुचेरी, गुजरात, तेलंगणा, पंजाब, दिल्ली आणि राजस्थानमध्येही कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

देशभरात कोरोना रुग्णातही झपाट्याने वाढ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी कोरोनाचे ३५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे संसर्गामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये केरळमध्ये ३, कर्नाटकात २ आणि पंजाबमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

JN.1 व्हेरिएंट किती घातक? लक्षणे कसे ओळखाल?

‘जेएन.१’ व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, गॅस्ट्रो, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्याने नागरिकांनी वेळीच सतर्क होऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जेएन १ व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत असला तरी, तो किती घातक आहे याबाबत अजूनही ठोस पुरावे मिळाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT