Corona Symptoms Saam Tv
देश विदेश

Corona Symptoms : तुम्ही कोव्हिड पॉझिटिव्ह तर नाही ना? ही लक्षणं दिसल्यास लगेच करा टेस्ट, नव्या व्हेरियंटमुळे धाकधुक वाढली

Corona News : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता भारतात कोरोनाने पुनरागमन केले आहे. कोरोना नवे व्हेरिएंट भारतात आढळले आहेत. नव्या व्हेरिएंटच्या लक्षणांबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

Yash Shirke

भारतात कोरोना व्हायरसने पुनरागमन केले आहे. समोर आलेली बहुतांश प्रकरणे ही सामान्य असून कोरोनाबाधित रुग्णांना कोणाताही धोका नसल्याचे म्हटले जात आहे. जेव्हा कोरोना सुरुवातीच्या टप्प्यात होता, तेव्हा गंध न समजणे, चव न लागणे या गोष्टी कोरोनाची सर्वात प्रमुख लक्षणे मानली जात होती. आता नव्याने आलेल्या कोरोना व्हेरिएंटच्या लक्षणांमध्ये बदल झाला आहे का? नव्या व्हेरिएंटची लक्षणे कोणती आहेत? चला जाणून घेऊयात..

हवामानात बदल झाल्याने अनेकांना ताप, सर्दी-खोकला किंवा घसा खवखवणे यांसारख्या समस्या येत आहेत. पण ही कोरोनाची लक्षणे आहेत का असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. सिंगापूर, हाँगकाँगनंतर भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. मुंबई, पुणे यांसह इतर शहरांमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा NB.1.8.1 हा व्हेरिएंट फार गंभीर नसल्याचे म्हटले आहे. याच्या लक्षणांमध्ये घसा खवखवणे, सतत थकवा जाणवणे, सौम्य ताप, स्नायू दुखणे, सर्दीमुळे नाक बंद होणे, सतत डोकेदुखी आणि गॅसशी संंबंधित समस्यांचा समावेश असू शकतो अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. केरळ, कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये कोरोनाच्या NB.7 प्रकाराचे अधिक रुग्ण आढळले आहेत. तर परदेशी प्रवाशांमध्ये NB.1.8.1 संसर्ग आढळून आला आहे.

आतापर्यंत आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये चव आणि गंधाशी संबंधित समस्या असल्याची लक्षणे दिसून आलेली नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जर कोरोनाची इतर लक्षणे आढळली, तर घरी अँटीजेन चाचणी किंवा आरटी-पीसीआर चाचणी करू शकता. लक्षणे आढळल्यास घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सतत पाणी पित राहावे, ऑक्सिजनची लेव्हल चेक करत राहावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT