Corona in India SAAM TV
देश विदेश

कोरोनाचा आलेख किंचित घसरला; अशी आहे देशातील सद्यस्थिती...

देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट झाली

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात सातत्याने कोरोना (Corona) रुग्ण वाढत होते. मात्र आता त्यामध्ये किंचित घट झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोरोना रुग्णसंख्येत (corona new patients) काहीशी घट झाली. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 528 नवीन रुग्णांची नोंद झाली. याशिवाय सोमवारी दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Cases In India)

विशेष बाब म्हणजे आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी देशात 16 हजार 935 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर यादरम्यान, 51 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याआधी सलग चार दिवस देशात 20 हजारांहून अधिक कोरोना आढळले होते.

सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ

दरम्यान, देशात नव्याने आढळून कोरोना रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांची सक्रिय संख्या आता 1 लाख 43 हजार 654 इतकी झाली आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासांत 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 5 लाख 25 हजार 785 वर पोहचली आहे. (Corona Cases In Maharastra)

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळून येत आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 1 हजार 111 नवे रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत 1474 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. सोमवारी मुंबईत सर्वाधिक म्हणजे 176 रुग्णांची भर पडली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT