Covid 19 Alert In India  SAAM TV
देश विदेश

Covid 19 Alert: सर्व राज्यांना अॅलर्ट; सरकारनं उचललं 'हे' मोठं पाऊल; मास्क, सोशल डिस्टन्सिंग...

Covid 19 Alert Latest : चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरू असतानाच, भारतानं सावध पावलं उचलली आहेत.

Nandkumar Joshi

Covid 19 Alert Latest: चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरू असतानाच, भारतानं सावध पावलं उचलली आहेत. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना अॅलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

टेस्ट-ट्रॅक-ट्रीड आणि लसीकरण यावर अधिक लक्ष केंद्रीत करावे, असेही त्यांनी सांगितले. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आणि आगामी उत्सव काळात मास्क, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन होईल हे सुनिश्चित करावे, असेही ते म्हणाले.(Latest Marathi News)

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोविड १९ चा प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, तयारी आणि कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम आदींबाबतचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यांनी राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व तयारी करण्यास सांगितले. (Corona Latest News)

केंद्र आणि राज्यांना मागच्या वेळी जसे झोकून देऊन काम केले तसे यावेळी सहकार्याच्या भावनेतून काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यांची दक्षता प्रणाली अधिक मजबूत करण्याचा सल्लाही डॉ. मांडविया यांनी दिला.

तत्पूर्वी, डॉ. मांडविया यांनी चीनमधील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता भारताची काय तयारी आहे, याबाबत स्वतः राज्यसभेत माहिती दिली होती. आम्ही सातत्यानं भारतातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. चीन आणि भारत या दोन्ही देशांत थेट अशी विमानसेवा नाही. पण लोक पर्यायी मार्गाने येत आहेत, असं ते म्हणाले होते. कोरोना विषाणूच्या कोणत्याही अज्ञात प्रकाराने भारतात शिरकाव करू नये, हे सुनिश्चित करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत असेल, असेही ते म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amarnath Yatra Bus Accident : अमर यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

SCROLL FOR NEXT