Court News
Court News  Saam Digital
देश विदेश

Court News : पत्नीला पतीने सार्वजनिक ठिकाणी कानशिलात लगावणं गुन्हा ठरत नाही; न्यायालय असं का म्हणालं? जाणून घ्या

Sandeep Gawade

Court News

पतीने सार्वजनिक ठिकाणी पत्नीला मारल्यामुळे तीचा अपमान होत नाही, अशी टिप्पणी करत जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने पत्नीने पतीविरोधात दाखल केलला खटला फेटाळून लावला आहे. संबंधित व्यक्तीने कौटुंबिक वादातून सार्वजनिक ठिकाणी पत्नीच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याच्याविरोधात भादंवि ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ नुसार सार्वजनिक ठिकाणी पत्नीच्या कानशिलात लगावणे हा तिच्या प्रतिष्ठेचा अपमान होत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

संबंधित पती पत्नीचा वारंवार कौटुंबिक सुरू होता. वाद विकोपाला गेल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं होतं. दरम्यान या वादाचा खटला न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे हे दांपत्य सुनावणीसाठी कोर्टात आलं होतं. यावेळी एकमेकांसोर आल्यानंतर पतीने सार्वजनिक ठिकाणी रागाने बघितलं आणि कानशिलता लगावली. त्यामुळे पत्नीने पुन्हा पतीविरोधात ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोर्ट काय म्हणालं?

मुळात ज्या कलमाखाली हा गुन्हा नोंद करण्यात आला, त्या अंतर्गत हा गुन्हा ठरत नाही, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. पतीने पत्नीला सार्वजनिक ठिकाणी केलेली मारहाण केलेला गुन्हा आयपीसीच्या कलम ३५४ अंतर्गत नोंद केला गेला आहे. या कलमांतर्गत हा गुन्हा ठरत नाही मात्र कलम ३२३ अंतर्गत मात्र याचा विचार होऊ शकतो, कारण जाणिवपूर्वक एखाद्यांचं नुकसान करणं आयपीसी कलम ३२३ अंतर्गत गुन्हा ठरतो. न्यायालयाने नोंदवलेलं हे निरीक्षण संबंधित महिलेच्या वकिलांनीही मान्य केलं आहे. त्यामुळे न्यायालयाने हा खटला रद्द केला आहे, मात्र ३२३ अंतर्गत खटला नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: १६ महिन्यात राज्यात ३००० हून अधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, विधानसभेत जयंत पाटील संतापले

VIDEO: पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट, मंत्री भुसेंना पीक विमा केंद्र चालकांचा पुळका? विरोधकांचा हल्लाबोल

Bhushi Dam: सावधान! मान्सून पिकनिक बेतेल जीवावर; नको ते धाडस कराल जीवाला मुकाल

Special Report : मगर रस्त्यावर,नागरिकांची भीतीनं गाळण

Special Report: दूध दरासाठी शेतकऱ्यांचं उपोषणास्त्र

SCROLL FOR NEXT