Coronavirus Cases Today: दिलासादायक! कोरोनाबाधितांची संख्या घट; गेल्या 24 तासांत 1 लाख 49 हजार 394 रुग्णांची नोंद  Saam TV
देश विदेश

Coronavirus Cases Today: दिलासादायक! कोरोनाबाधितांची संख्या घट; गेल्या 24 तासांत 1 लाख 49 हजार 394 रुग्णांची नोंद

जगामध्ये कोरोनाचा कहर बघायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनाच्या पुढे हतबल झाले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: जगामध्ये कोरोनाचा (Corona) कहर बघायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनाच्या (Corona) पुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसाअगोदरच देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची (patients) संख्यादेखील वाढत होती. मात्र, आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसून येत आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल ३ कोटींचा टप्पा पार केला आहे.

हे देखील पहा-

मात्र, असे सर्व काही असताना देखील याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशात नव्या रुग्णांच्या (patients) संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनाविषयी आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरामध्ये कोरोनाचे १ लाख ४९ हजार ३९४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात (India) कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल ३ कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशभरात तब्बल ५ लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा ५ लाख ५५ वर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) याविषयी माहिती दिली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ४९ हजार ३९४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. लाखो लोकांनी कोरोनावर मात केली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. यादरम्यानच जागतिक आरोग्य संघटना (WHO) जगात सर्व देशांना कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन विषयी सातत्याने धोक्याचा इशारा देत ​​आहे.

WHO ने लोकांना धोका अद्याप टळलेला नाही असे सांगितले आहे. जगात अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनच्या लाटेचा उच्चांक येणे बाकी आहे. यामुळे कोरोना निर्बंध (Covid 19 Restrictions) हे हळूहळू शिथिल होत आहेत. मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड (Covid)- १९ वर बनलेल्या टेक्निकल लिडने हा सल्ला दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

SCROLL FOR NEXT