India Corona Update, Covid 19 Lates News, Covid Cases In India, Coronavirus Live Update
India Corona Update, Covid 19 Lates News, Covid Cases In India, Coronavirus Live Update Saam Tv
देश विदेश

काळजी घ्या! देशात कोरोनाचे 18 हजारांहून अधिक नवे रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) व्हायरसचा प्रादुर्भाव काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दिवसागणिक कोरोनाचे 15 हजारांहून अधिक रुग्ण (Corona Cases) आढळून येत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर यादरम्यान 38 रुग्णांचा मृत्युही झाला आहे. (Corona Cases India Today)

एकीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग आणि दुसरीकडे पावसाळ्याच पसरणाऱ्या साथीच्या रोगांमुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. दरम्यान, नव्याने बाधित आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1,38,262 वर पोहोचली आहे. तर दैनंदिन सकारात्मकता दर आता 4.32% टक्के इतका झाला आहे.

गुरूवारी देशभरात कोरोनाचे 18 हजार 815 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले होते. यादरम्यान 35 जणांचा मृत्यू झाला होता. गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी रुग्णसंख्येत किंचित घट झाली असली तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आणि सक्रिया रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. (Coronavirus Live Update)

सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2 हजार 678 नव्या रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर तीन हजार 238 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी राज्यात 3142 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी 3238 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT