वृत्तसंस्था: कोरोना (Corona) व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. प्रगत देश कोरोनापुढे मोठ्या प्रमाणात हतबल झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका अधिक वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र, आता सध्या देशामध्ये कोरोनाचा (Corona) वेग मंदावताना दिसत आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या (Corona) संख्येने तब्बल ३ कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र या दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशात नव्या रुग्णांच्या (patients) संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. (Coronavirus 10273 new corona patients last 24 hours country 243 deaths)
हे देखील पहा-
कोरोनाविषयी (Corona) आता सुखावणारी आकडेवारी समोर येत आहे. पॉझिटिव्हिटी (Positivity) रेट देखील कमी झाला आहे. मागील २४ तासामध्ये देशभरात कोरोनाचे १० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात (India) कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल ३ कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे (Corona) देशभरात तब्बल ५ लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा ५,१३,७२४ वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासामध्ये कोरोनाचे १०,२७३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. लाखो लोकांनी कोरोनावर मात केली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.
देशात सक्रिय रुग्णांची संख्या १,११,४७२ वर पोहोचली आहे. तर ४,२२,९०,९२१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर हा १ टक्क्यावर पोहोचला आहे. तर आठवड्याचा १.३६ टक्क्यांवर आहे. राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी केल्यानंतर दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संसर्ग रोखण्याकरिता लादण्यात आलेल्या अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. DDMA च्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी DDMA बैठकीत सांगितले की, आता कोरोना नियंत्रणात आहे आणि दिल्लीमध्ये सर्व काही सुरू केलं पाहिजे. दिल्लीत कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यावर १ एप्रिलपासून सर्व शाळा पूर्णपणे सुरू होणार आहेत.
दिल्लीत कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह दर १ टक्क्यापेक्षा कमी झाल्यास दिल्लीतील रात्रीचा कर्फ्यू सोमवारपासून संपणार आहे. सध्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीवर दिल्लीमध्ये मास्क न घालण्याचा दंड देखील कमी करण्यात आला आहे. मास्क न घातल्याबद्दल २ हजार रुपयांचा दंड कमी करून ५०० रुपये करण्यात आला आहे. DDMA दिल्लीत बस आणि मेट्रोमध्ये उभे राहून प्रवास करण्याची परवानगी देखील दिली आहे. याबरोबरच दुकाने उघडण्याची आणि बंद करण्याची मुदत देखील संपणार आहे. याशिवाय रेस्टॉरंट्स उघडण्यासाठी वेळेची मर्यादा नसेल आणि रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत सुरू राहू शकणार आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.