मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता समाजाच्या विविध मागण्याकरिता खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) हे आमरण उपोषणाला बसले आहेत. कालपासून आझाद मैदानावर (Azad Maidan) त्यांच्या उपोषणाल सुरूवात झाली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दिवस आहे. या दरम्यान, संभाजीराजेंना पाठिंबा देण्याकरिता अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईमध्ये (Mumbai) दाखल होत आहेत. या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानामध्ये पहिल्या रात्रीचा मुक्काम केला आहे.
हे देखील पहा-
दरम्यान, मराठा (Maratha) समाजाच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार संभाजीराजेंनी यावेळी केला आहे. १५ फेब्रुवारीला संभाजीरजे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले, तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. कालच्या दिवसभरामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच राज्यात काही संघटनांनी देखील संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटनाबरोबरच नेत्यांचा देखील पाठिंबा मिळत आहे.
आम आदमी (Aam Aadmi Party) पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे (Delhi CM) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भर पडली आहे. त्यांनी संभाजीराजे यांना पाठिंब्याचे पत्र देत या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, काल दिवसभरामध्ये अनेक नेत्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावली होती. तसेच संभाजीराजे यांची भेट घेतली आहे. भाजपचे (BJP) नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार (MLA) प्रसाद लाड यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे देखील आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता आज तुळजापूर येथे लक्षणिक उपोषण करणार आहेत.
तसेच काल हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील उपोषणस्थळी हजेरी लावत संभाजीराजे यांना पाठिंबा दर्शवला आहे. छत्रपती घराण्याच्या तलवारीची ख्याती आहे. आज या राजघराण्याला मराठा समाजाच्या मागण्याकरिता उपोषण करावे लागत आहे. संभाजीराजेंना उपोषण करावे लागले हा माझा आयुष्यामधील काळा दिवस आहे असे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. माझे राजे उपाशी असताना मी घरात कसा बसेन? मी या ठिकाणी छत्रपतींचा मावळा म्हणून आलो आहे.
दिल्लीमध्ये आम्ही राजेंच्या सोबत लढतोय. आज मराठा समाजाच्या मागण्याकरिता राजघराण्याला उपोषणासाठी बसावे लागत आहे, हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या या संदर्भात बैठका सुरू आहेत. मी याविषयी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाने मांडणार असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय होणार, असे देखील माने यावेळी म्हणाले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.