Pune: देशात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धा; पुण्यात आयोजन

देशामध्ये पहिल्या रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Pune: देशात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धा; पुण्यात आयोजन
Pune: देशात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धा; पुण्यात आयोजनगोपाळ मोटघरे
Published On

पुणे: देशामध्ये पहिल्या रात्रीच्या वेळी मॅरेथॉन (Marathon) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ३५ व्या पुणे (Pune) आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला (International Marathon) काल रात्री १२ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. देशामध्ये प्रथम अशा पद्धतीने रात्रीची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येकवर्षी होणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा यावेळी रात्री घेण्याचे कारण म्हणजे कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. (For first time the country night marathon competition)

हे देखील पहा-

मात्र ही स्पर्धा रात्री घेण्यात आली असली तरी धावपटूंचा आणि पुणेकरांचा उत्साह मात्र आजिबात कमी नव्हता. पुण्याच्या क्रीडा विश्वात मानबिंदू ठरलेल्या आणि पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर (map) नेणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला प्रत्येकवर्षी उत्साही पुणेकरांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता देशात पहिल्यांदाच ही रात्रीची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.

Pune: देशात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धा; पुण्यात आयोजन
Kalyan Crime: प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; विवाहित प्रियकराने कायमचाच काढला काटा

या पुण्याच्या मॅरेथॉनला देश- विदेशामधून मॅरेथॉनपटू येत असतात. यावर्षी देखील पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये परदेशामधील ३० धावपटू आणि देशातील २५०० धावपटू सहभागी झाले होते. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते या मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली होती. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आज सकाळी मुंबई काँग्रेसतर्फे महिलांसाठी "लडकी हूँ लड़ सकती हूँ " या नावाने महिलांसाठी ५ किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com