Corona News Updates, Covid 19 News Updates in Marathi
Corona News Updates, Covid 19 News Updates in Marathi Saam Tv
देश विदेश

धडकी भरवणारा आकडा! देशात २४ तासांत कोरोनाचे ७ हजारांहून अधिक रुग्ण; ८ मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा (Corona) प्रादुर्भाव दिसत आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 7 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या आढळून आल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णांचा आकडा 40 टक्क्यांनी वाढला आहे. (Corona Virus Latest Update in India)

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 7 हजार 240 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 32 हजार 490 इतकी झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे यातील 2 हजार 701 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहे. नव्याने आढळून आलेली ही रुग्णसंख्या गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. (Corona News Updates)

विषेष बाब म्हणजे कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर देशात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून आली होती. मात्र, बुधवारी देशात तब्बल 93 दिवसांनंतर 5 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आलेत. आज हा आकडा 7 हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरणार की, काय? अशी भिती व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रात एकाच दिवसात रुग्णसंख्येत दुप्पट

महाराष्ट्रात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाच्या तब्बल 2701 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांत घट झाली होती. काल राज्यात 1881 रुग्णांची नोंद झाली होती, पण आज कोरोना रुग्णांनी दोन हजाराचा आकडा पार केला आहे. त्यामुळे राज्याची चिंता पुन्हा वाढली आहे. आज राज्यातील 1327 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्रात 9,806 रुग्ण उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे सलग तिसऱ्या दिवशीही कोविड 19 मुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 77,41,143 झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेला पुन्हा सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोना टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT