मोठी बातमी! राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर

राज्यात येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam Tv
Published On

मुंबई : राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून नाट्यमय घडामोडी घडत असताना, दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून (NCP) उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. राज्यात येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (NCP Legislative Council Election candidate Latest News)

Sharad Pawar
Bhima Koregaon Case : मुख्यमंत्र्यांसह पाच पक्षांच्या प्रमुखांना आयोगाचं समन्स

राज्यात येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. याकरिता आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने उमेदवारांची यादी जाहीर केली असून, एकनाथ खडसे आणि राम राजे निंबाळकर यांना संधी मिळाली आहे. आज एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीकडून अर्ज भरतील.

विधान परिषदेचा अर्ज भरण्यासाच्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादीकडून उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे एकनाथ खडसे यांना गॅसवरच ठेवलंय का? अशी चर्चा सुद्धा सुरू झाली होती. मात्र अखेर या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

Sharad Pawar
...तर आम्ही तडजोड करण्यासाठी तयार आहोत, MIM चे खासदार इम्तियाज जलील म्हणाले...

विधान परिषद उमेदवारीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला उतरवायचं, यावर चर्चा झाली. यामध्ये एकनाथ खडसे यांचं नाव प्राधान्यानं पुढे घेण्यात आलं. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांना गेल्या कित्येक दिवसांपासून राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा होती. आता त्यांची ही प्रतिक्षा संपली असून आज खडसे हे विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज भरतील.

Sharad Pawar
'संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर...'; उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

खडसेंना उमेदवारी देवून राष्ट्रवादीला काय लाभ?

पश्चिम महाराष्ट्रात प्रबळ असलेल्या राष्ट्रवादीला खानदेशातून एकनाथ खडसेंसारखा मजबूत नेता मिळाला आहे. त्यामुळे खानदेशातही आता राष्ट्रवादीला पक्ष विस्तार करण्यास संधी आहे. खुद्द शरद पवार यांनीही आता खानदेशात राष्ट्रवादीची भरभराट होईल, अशी आशा व्यक्त केली होती.

आगामी महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंना विधान परिषद उमेदवारी दिल्याने या प्रदेशातील प्रभाव वाढवणं राष्ट्रवादी काँग्रेसला सोपं जाईल. या भागात भाजप नेते गिरीश महाजनांसमोर खडसे यांचं आव्हान उभं करण्यात राष्ट्रवादीला यश मिळालं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com