...तर आम्ही तडजोड करण्यासाठी तयार आहोत, MIM चे खासदार इम्तियाज जलील म्हणाले...

शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त आज शिवसेनेची स्वाभिमान सभा मराठवाड्यात पार पडली.
imtiaz jalil
imtiaz jalil SaamTvNews

औरंगाबाद : येथे शिवसेनेच्या (shivsena) पहिल्या शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त आज शिवसेनेची स्वाभिमान सभा मराठवाड्यात पार पडली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभास्थानी जय्यत तयारी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित शेकडो शिवसैनिकांना संबोधित केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी औरंगाबादच्या नामंतराबाबतही मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं. रंगाबादचा विकास झाल्यानंतर नामांतराचा विषय पाहू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

imtiaz jalil
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : मंत्रालयात झाली बैठक, जयंत पाटील यांनी दिल्या 'या' सूचना

औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महराजांच नाव देण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत केलेल्या घोषणेचाही आम्ही स्वागत करतो, असं जलील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. एमआयएम उमेदवारांच्या मतदारसंघात विकास होणार असेल, तिथल्या लोकांचं भल होणार असेल, तर आम्ही तडजोड करण्यासाठी तयार आहोत. असं जलील म्हणाले आहेत.

imtiaz jalil
धन-'धान'-धन...शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार; खरीप पिकांसाठी MSP वाढवला

माध्यमांशी बोलताना जलील पुढे म्हणाले, सुभाष देसाई भाषणात शहराच्या पाणी पुरवठ्याबद्दल बोलले ते खोटं आहे. कितीही प्रयत्न केले तरी औरंगाबादला पाणी मिळण्यासाठी ३ ते ४ वर्षे लागतील. टीका करताना मुद्दे लागतात.इम्तियाज जलील काय चुकीचे काम करतात, हे शोधून देखील सापडल नसेल,

त्यामुळे बहुतेक आमच्यावर टीका केली नसेल. राज्यसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत महविकास आघाडी,भाजप किंवा अन्य कुणीही संपर्क केला नाही. तुम्ही आले संपर्क केला तर विचार करू. आम्ही वाट पाहू. मतदान करताना आमच्या अटी आहेत. भाजपला एमआयएमचं उत्तर माहीत आहे, त्यामुळे ते आमच्याकडे आले नसावेत. असंही जलील म्हणाले.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com