धन-'धान'-धन...शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार; खरीप पिकांसाठी MSP वाढवला

शेतकऱ्यांना अच्छे दिन आल्याचे संकेत आहेत. १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंंमतीत वाढ करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे.
MSP Hikes for Kharif Crops Farmers Latest News Update
MSP Hikes for Kharif Crops Farmers Latest News UpdateSAAM TV

नवी दिल्ली: देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. केंद्र सरकारने बुधवारी २०२२-२३ या वर्षासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांवर २०२२-२३ या वर्षासाठी वाढीव किमान आधारभूत किंमत मिळेल. (MSP Hikes for Kharif Crops)

MSP Hikes for Kharif Crops Farmers Latest News Update
Washim | टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल !;झाला 7 लाखांचा नफा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आर्थिक विषयक मंत्रिमंडळ समितीनं (सीसीईए) २०२२-२३ या पीक वर्षासाठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.

मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आज, बुधवारी कॅबिनेट बैठकीत १४ खरीप पिकांसाठी एमएसपी वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. (Farmer)

धानाच्या एमएसपीमध्ये प्रतिक्विंटल १०० रुपयांनी वाढ

धानाच्या (भात) साधारण ग्रेडच्या एमएसपीमध्ये २०२२-२३ या पीक वर्षात वाढ करून २०४० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. मागील वर्षी धानाची एमएसपी १९४० रुपये प्रतिक्विंटल इतकी होती. धानाच्या 'ए' ग्रेडची एमएसपी १९६० रुपये प्रतिक्विंटलवरून २०६० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. भात हे प्रमुख पीक असून, त्याची पेरणीही सुरू झाली आहे.

MSP Hikes for Kharif Crops Farmers Latest News Update
Marathwada। ऊस तोडणी झाल्यामुळे शेतकरी आनंदी; शेतकऱ्यांचा डीजे लावून जल्लोष

मागील तीन वर्षांत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं

गेल्या तीन वर्षांत चांगला पाऊस झाल्यानं खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात सरासरी २.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात गेल्या तीन वर्षांत वाढ झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी, तसेच कृषी क्षेत्राचा व्यापक विकास सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांत सुरू केलेल्या अनेक योजनांचा आढावाही मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com