Corona Symptoms Fake Message  SAAM TV
देश विदेश

Corona Symptoms Fake Message : कोरोना लक्षणांविषयी 'हा' बोगस मेसेज होतोय व्हायरल, Alert

Covid 19 Fake Message Viral : कोरोनासंबंधी सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. अनेक बोगस मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

साम ब्युरो

Covid 19 Fake Message Viral : चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. भारतातही सरकार अॅलर्ट मोडवर आहे. त्याचवेळी कोरोनासंबंधी सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. अनेक बोगस मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट BF.7 याविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. नवा व्हेरियंट जीवघेणा आणि अधिक वेगानं फैलावणारा असल्याचं सांगितलं जातंय. उपचार पद्धती आणि त्यापासून कसं संरक्षण करायचं याबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट हा अधिक धोकादायक आणि त्याचं योग्य निदान होणे इतके सोपे नाहीये, असा उल्लेख त्या बनावट मेसेजमध्ये करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मेसेजमध्ये दिली जातेय चुकीची माहिती

कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या नव्या सबव्हेरियंटच्या लक्षणांसंबंधी चुकीची माहिती मेसेजमधून दिली जात आहे. या व्हेरियंटचा संसर्ग झाल्यास खोकला आणि ताप येत नाही. याशिवाय सांधेदुखी, डोकेदुखी, मान दुखणे, कंबर दुखणे, निमोनिया आणि भूक न लागणे ही सौम्य लक्षणे आहेत, अशी चुकीची माहिती या मेसेजमधून दिली जात आहे. (Omicron

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत पाच पटीने हा प्रकार धोकादायक आहे आणि त्याचा मृत्युदर तुलनेत अधिक आहे, अशी चुकीची माहितीही दिली जात आहे. याची लक्षणे दिसून येत नाहीत. पण संसर्ग झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती खालावते, असंही चुकीचं पसरवलं जातंय. (Corona Latest News)

ओमिक्रॉनसंबंधी मेसेजमध्ये ही चुकीची माहिती

  • हा संसर्ग फुफ्फुसावर अधिक परिणाम करतो

  • काही रुग्णांच्या छातीचा एक्सरे काढल्यावरच निमोनियाचं निदान होतंय.

  • नेजल स्वॅबने केलेल्या चाचण्या निगेटिव्ह येतात

  • हा व्हेरियंट कम्युनिटीमध्ये सहजगत्या पसरतो

  • या व्हेरियंटमुळं फुफ्फुसावर वाइट परिणाम होतो

  • श्वास घेण्यास त्रास होतो

  • येणारी कोरोना लाट अधिक धोकादायक असेल

  • सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये दीड मीटरचं अंतर ठेवावं

  • डबल लेयर मास्क घातल्यास कोविडपासून संरक्षण होईल

अफवांकडे दुर्लक्ष करा

या व्हायरल मेसेजबाबत तज्ज्ञांकडून सल्ला दिला जात आहे. ओमिक्रॉनचे सब व्हेरियंट BF.7 चा कोणताही रुग्ण गंभीर नाही, असे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा जो मेसेज व्हायरल होत आहे, तो साफ चुकीचा आहे. या व्हेरियंटमुळे फुफ्फुसावर कोणताही परिणाम होत नाही. अशावेळी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोविडपासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करा आणि सावध राहावं, असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT