Covid 19 Alert : चीनमध्ये कोरोना रुग्णांचे आकडे वाढताहेत. रुग्णालयांमध्ये जागा नाही. पुढच्या तीन महिन्यांत भीषण परिस्थिती चीनमध्ये निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूण लोकसंख्येच्या किमान ६० टक्के लोक संसर्गबाधित होण्याचा अंदाज विशेषज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
चीनमध्ये कोरोना रुग्ण वाढताहेत, त्यामुळं भारतातही खबरदारी म्हणून पावलं उचलायला सुरुवात केली आहे. ही चीनची कोरोना लाट भारतात धडकणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. पण याबाबत साथरोग विशेषज्ज्ञांचं म्हणणं वेगळंच आहे. (Latest Marathi News)
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च (ICMR) चे डॉ. समीरन पांडा यांनी फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीत चीनमध्ये सध्या काय आहे परिस्थिती? भविष्यात तेथे काय होऊ शकतं, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय, त्याचे भारतात काय परिणाम होऊ शकतात असा प्रश्न विचारला असता, डॉ. पांडा म्हणाले की, 'लोकसंख्याशास्त्रानुसार, सर्व देश एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. २०२० मध्ये जे काही झालं, त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही. हा संसर्ग रोखण्यासाठी काय केलं पाहिजे, हे आता माहिती झालं आहे. लोकांची रोगप्रतिकारशक्ती कशी आहे? लसीकरण आणि त्याचं महत्व आदींबाबत सर्व माहिती आहे. त्यामुळं एका देशात रुग्णसंख्या वाढली म्हणून त्याचा दुसऱ्या देशांवर प्रभाव पडेल असं होऊ शकत नाही.' (Corona Virus)
भारतात भविष्यात कोरोना रुग्ण वाढतील का?
भारतात भविष्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चीनसारखी झपाट्याने वाढ होईल का असं डॉ. पांडा यांना विचारलं असता, ते म्हणाले की, जे काही चीनमध्ये घडतंय, ते भारतात होईलच असं मानणं चुकीचं ठरेल.
दरम्यान, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोविड १९ च्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणांवर मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.