Corona Alert: पुन्हा मास्क लावा, कोरोनाने चिंता वाढवली; केंद्र सरकारने उचलली महत्त्वाची पावलं

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दर आठवड्याला कोरोनाची रिव्ह्युव्ह मिटिंग घेणार असल्याचंही म्हटलं आहे.
अनिश्चिततेच्या वातावरणातच होणार २०२२ मध्ये प्रवेश....
अनिश्चिततेच्या वातावरणातच होणार २०२२ मध्ये प्रवेश....- Saam Tv
Published On

नवी दिल्ली : चीनमधील कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या धडकी भरवणारी आहे. चीनशिवाय इतर काही देशांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी आज उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दर आठवड्याला कोरोनाची रिव्ह्युव्ह मिटिंग घेणार असल्याचंही म्हटलं आहे. तर महत्त्चाचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला केंद्र सरकाने दिला आहे.  (Latest Marathi News)

अनिश्चिततेच्या वातावरणातच होणार २०२२ मध्ये प्रवेश....
Bharat Jodo Yatra: ...तर भारत जोडो यात्रा लगेच थांबवा; केंद्रीय मंत्र्याचं राहुल गांधींना पत्र

जपान, अमेरिका, कोरिया, ब्राझील आणि चीनमधील कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत असल्याने जीनोम चाचणीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सर्व राज्यांना सर्व संक्रमित प्रकरणांचे नमुने दररोज INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Corona Virus

अनिश्चिततेच्या वातावरणातच होणार २०२२ मध्ये प्रवेश....
Imran Khan Viral Audio Clip: महिलेसोबचे अश्लिल संभाषण थेट युट्यूबवर! व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे इम्रान खान पुन्हा अडचणीत

बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्वीट करत म्हटलं की, काही देशांमध्ये कोविड-19 ची वाढती प्रकरणे पाहता आज आरोग्य तज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. कोविड अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधितांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत.

सध्या भारतात कोरोना नियंत्रणात आहे, मात्र भविष्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू नये यासाठी तयारी सुरू झाली आहे. ICMR, NITI आयोग आणि आरोग्य सेवेशी संबंधित सर्व लोकांनी या बैठकीत सहभाग घेतला आणि आपल्या सूचना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com