Corona JN.1 Variant Update Saam Digital
देश विदेश

Corona JN.1 Variant Update: सध्याची कोरोना लस JN.1 व्हेरियंटवर प्रभावी ठरेल का? तज्ज्ञांनी सांगितलं....

Corona JN.1 Variant Update: जवळपास एक वर्षानंतर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. सरकारी तज्ज्ञ, मायक्रोबायालॉजी विभागाची टीम आणि जीनोम सिक्वेन्सिंग लॅब या प्रकारावर काम करत आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे तो व्हॅक्सिनचा. सध्या भारतात उपलब्ध असलेली लस या व्हेरियंटवर प्रभावी ठरेल का?

Sandeep Gawade

Corona JN.1 Variant News

जवळपास एक वर्षानंतर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोविड-१९ च्या रुग्णांसह सब-व्हेरियंट JN.1 चेही रुग्ण आढळत आहेत. सब व्हेरियंट JN.1 हे देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचं मुख्य कारण मानलं जात असून वैद्यकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सरकारी तज्ज्ञ, मायक्रोबायालॉजी विभागाची टीम आणि जीनोम सिक्वेन्सिंग लॅब या प्रकारावर काम करत आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे तो व्हॅक्सिनचा. सध्या भारतात उपलब्ध असलेली लस या व्हेरियंटवर प्रभावी ठरेल का?

जागतीक आरोग्य संघटनेने मात्र या व्हेरियंटपासून जास्त धोका नसल्याचं म्हटलं आहे. मात्र जगभरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता व्यक्त केली आहे. मॅक्स हॉस्पिटलच्या इंटरनल मेलिसिन विभागाचे एचओडी डॉ. राजीव डांग यांनी दिलेल्या माहितीनुसार JN.1 या सब-व्हेरियंटची लक्षणे फ्लू सारखीच आहेत. जागतीक आरोग्य संघटनेनेही हा व्हेरियंट धोकादायक नसल्याचं म्हटलं आहे. तर JN.1 व्हेरियंट Omicron चे उपप्रकार आहेत. त्यामुळे सध्या भारतात उपलब्ध असलेल्या लस या व्हेरियंटचा प्रभाव कमी करण्यास सक्षम ठरेलं आणि WHO, CDC यांनीही याची पुष्टी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोरोना विषाणूत सतत होणारे बदल लक्षात घेता युनिव्हर्सल व्हॅक्सिनवर देखील काम केलं जात आहे. सध्या JN.1 प्रकारातील रुग्णांना सध्या रुग्णालात दाखल करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना गंभीर आजाह आहेत, त्यांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. खोकला, सर्दी आणि सौम्य ताप या प्रकारची लक्षणे सध्या जाणवत आहेत. त्यामुळे या व्हेरियंटचा मोठा धोका नाही , जी लस उपलब्ध आहे ती यावर प्रभावी ठरणार आहे. हॉस्पिटलमध्ये भरती होऊन किंवा लस घेऊन यावर नियंत्रण ठेवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT