Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
'इंडिया टुडे' च्या वृत्तानुसार, रेल्वेच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, बाजूने सांगण्यात आले आहे की, ट्रेन क्रमांक १२४८१ कोरोमंडल एक्सप्रेस (Coromandel Express Accident) बहंगा बाजार स्टेशनच्या (शालिमार-मद्रास) मुख्य मार्गावरून जात होती. त्याचवेळी अप लूप मार्गावरील मालगाडीला धडकली. रेल्वे पूर्ण वेगात असल्याने स्टेशनवर थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे २१ डबे रुळावरून घसरले तर ३ डबे डाऊन मार्गावर गेले.(Latest Marathi News)
दुसरी रेल्वे पास करण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर लूप लाइन आहे. बहंगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा दोन लूप लाइन आहेत. जेव्हा एखादी रेल्वे स्टेशनवरून पास होत असेल, तेव्हा दुसरी रेल्वे लूप लाइनवर उभी केली जाते.
त्याच वेळी डाउन लाइन ट्रेन १२८६४ यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहंगा बाजार स्टेशनवरून जात असताना कोरोमंडलला धडकली. यानंतर हावडा एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. 'इंडिया टुडे' च्या वृत्तानुसा रेल्वेने सांगितलं आहे की, कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये १२५७ लोकांनी आरक्षण केले होते. तर हावडा-यशवंतपूर एक्स्प्रेसमध्ये १०३९ लोकांनी आरक्षण केले होते.
बहंगा बाजार स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस पास करण्यासाठी मालगाडी सामान्य लूप लाइनवर उभी करण्यात आली. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य अप मार्गावरून भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसही डाऊन मार्गावरून जात होती. बहंगा बाजार स्थानकावर या गाड्यांना थांबा नव्हता. यातच दोन्ही गाड्या अतिवेगात होत्या.
यामध्ये बहंगा बाजार स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरली. रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्सप्रेसचे काही डबे मालगाडीला धडकले. अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसच्या मागचे दोन डबे देखील रुळावरून हसरले आणि कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले. हा अपघात भुवनेश्वर रेल्वे स्थानकापासून सुमारे १७१ किमी आणि खरगपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे १६६ किमी अंतरावर बालासोर जिल्ह्यातील बहंगा बाजार स्थानकावर झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.