Coromandel Express Accident: ओडिशा अपघातामागे मानवी चूक?

या घटनेत आतापर्यंत 261 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी आहेत.
Coromandel Express Accident
Coromandel Express AccidentSaam Tv

Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी 6 वाजून 51 मिनिटांना एक भीषण रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली.

या घटनेत आतापर्यंत 261 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी आहेत. घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरु आहे. या अपघातामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, यामागचे मुख्य कारण आतासमोर आले आहे. (Latest Marathi News)

Coromandel Express Accident
Bhayandar Crime: एका टॅटूमुळे लागला छडा! शिर नसलेल्या महिलेच्या हत्येचे गूढ उकलले; पती आणि भावाला अटक

या भीषण घटनेबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्सप्रेसला मुख्य मार्गावरून चेन्नईच्या दिशेने जात असताना अचानक या एक्सप्रेसने चेन्नईच्या (Chennai) दिशेने जाण्याऐवजी लूप लाइनमध्ये प्रवेश करून उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात मानवी चुकांमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोमंडल एक्सप्रेसला पुढे जाण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला होता त्यामुळे ही एक्सप्रेस न थांबता पुढे निघाली आणि उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकली. या अपघातात आतापर्यंत 261 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (Narendra Modi) ते देशातील अनेक नेत्यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

Coromandel Express Accident
Sanjay Raut Spit: संजय राऊत यांच्यावर मराठा समाज थुंकल्याशिवाय राहणार नाही; मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध

PM मोदींनी व्यक्त केले दुःख

ओदिशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं आहे.ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले कील, 'ओदिशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो. या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांबद्दल शोकसंवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून अपघातग्रस्तांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे.' 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com