पुराच्या पाण्यात महिलेला सुरु झाल्या प्रसव वेदना, पुढे जे झाले...  Saam tv news
देश विदेश

पुराच्या पाण्यात महिलेला सुरु झाल्या प्रसव वेदना, पुढे जे झाले...

महिला पोलीस वेळेवर आल्या नसत्या तर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मध्यप्रदेशातील (Madhyapradesh) राजगड जिल्हा (Rajgrah Jila) सध्या पुराच्या (Madhaypradesh Flood) विळख्यात आहे. सुथाळा (Suthala) रस्ताही पाण्याने भरलेला आहे. अशातच दोन महिला पोलीसांना या रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेला प्रसव वेदना सुरु असून तू पुराच्या पाण्याच अडल्याची माहिची मिळाली आणि या महिला पोलीस लगेच त्या सुथाळा रस्त्यावर पोहचल्या. याठिकाणी त्यांनी प्रसव वेदना होणाऱ्या महिलेची ऑटो रिक्षातच प्रसुती केल्याची माहिती मिळाली आहे. (Cops Help Woman Deliver Baby In Autorickshaw Amid Floods In Madhya Pradesh)

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण राजगढ जिल्ह्यातील सुथाळा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. महिलेला प्रसववेदना होत असल्याने ती रुग्णालयात निघाली होती. मात्र कोसळणारा पाऊस आणि रस्त्यावर साठलेले पुराचे पाणी यामुळे तिला रुग्णालयात पोहचण्यासाठी उशीर होत होता. मात्र पोलीस ठाण्यात तैनात महिला उपनिरीक्षक अरुंधती राजावत आणि त्यांच्या सहकारी कॉन्स्टेबल इतीश्री यांना याबाबत माहिती मिळाली आणि त्या तातडीने त्याठिकाणी दाखल झाल्या.

गर्भवती महिलेची स्थिती पाहून अरुंधती राजावत आणि कॉन्स्टेबल इतीश्री यांनी वेळ न घालवता केवळ ऑटोमध्येच महिलेला आधार देत तिची सुरक्षित प्रसूती केली. प्रसूतीनंतर आई आणि मूल दोघांनाही रुग्णालया त दाखल करण्यात आले.

सुथाळाच्या मोडबडली गावातील इक्लेश बाई (वय 25) यांच्या वडीलांना आपल्या मुलीला होणाऱ्या प्रसव पाहून तिला रुग्णालयात घेऊन चालले होते. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सुथाळा पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या माऊ निराहेच्या नाल्याला पुर आल्यामुळे संपुर्ण रस्स्तयावर पाणी आले होते. त्यामुळे पुढे जाण्यास अडचणी निर्माण होत होत्या.

मुलीचे दुःख पाहून वडिलांनी जवळचे पोलीस स्टेशन गाठले आणि मदत मागितली. अरुंधती राजावत यांनी आरोग्य केंद्रातून परिचारिकेला फोन केल्यानंतर, पोलीस ठाण्यात तैनात महिला उपनिरीक्षक, तिच्या टीमसह तातडीने गर्भवती महिलेपर्यंत पोहोचल्या. या महिलांच्या संपूर्ण टीमने इक्लेश बाईंची यशस्वी प्रसूती केली. इक्लेश बाईंनी आपल्या नवजात बाळाला कुशीत घेतल्या नंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

जर या महिला पोलीस बहिणी वेळेवर आल्या नसत्या तर माझा आणि माझ्या बाळाचा जीव धोक्यात येऊ शकला असता, असे म्हणत इकलेश बाईंनी उपनिरीक्षक अरुंधती राजावत आणि त्यांच्या टीमचे आभार आणि कृतज्ञताही व्यक्त केली. तर इक्लेशबाईचे वडील म्हणाले, “महिला पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यांसह माणूलकीचा आदर्श ठेवला आहे. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. ”

राजगडचे पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनीही महिला पोलिसांचे कौतुक केले आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या या माणूसकीचे आता सर्वच स्तरातून कौतुक करत आहे. सामान्यतः लोकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसतो, परंतु राजगडच्या महिला पोलीसांनी आपल्या कामगिरीतून माणूसकीचे दर्शनच घडवून दिले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT