Tokyo Olympics: गोल्फमध्ये भारताचा झेंडा फडकवणारी आदिती अशोक कोण ?

आपली मेहनत आणि आई -वडिलांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे अदिती टोकियोमध्ये चमकली.
Tokyo Olympics: गोल्फमध्ये भारताचा झेंडा फडकवणारी आदिती अशोक कोण
Tokyo Olympics: गोल्फमध्ये भारताचा झेंडा फडकवणारी आदिती अशोक कोण
Published On

23 वर्षीय गोल्फर (Golf) अदिती अशोक (Aditi Ashok Golf) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) पदकापासून वंचित राहिली असेल, परंतु तिच्या कामगिरीने तिने गोल्फ खेळामध्ये भारताचा झेंडा उंचावला. ती इतिहास घडवण्याच्या अगदी जवळ होती. 18 व्या छिद्रात फक्त काही सेंटीमीटरने चुकली नसती तर पदक तिच्या गळ्यात पडले असते. अदिती गोल्फमध्ये स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर राहिली. (Who is Aditi Ashok who flies the Indian flag in golf?)

हे देखील पहा -

कोण आहे गोल्फर अदिती अशोक?

अदिती मूळची कर्नाटकची आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये 29 मार्च 1988 रोजी येथे झाला. आदितीने वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी गोल्फ खेळायला सुरुवात केली. वडील अशोक आणि आई मॅश आधीच गोल्फ खेळत. अशा परिस्थितीत अदितीने तिच्या पालकांकडून गोल्फने गोल्फचे धडे गिरवले. वयाच्या 9 व्या वर्षी अदितीने तिची पहिली स्पर्धा जिंकली. वयाच्या 12 व्या वर्षी ती राष्ट्रीय संघात सामील झाली.

Tokyo Olympics: गोल्फमध्ये भारताचा झेंडा फडकवणारी आदिती अशोक कोण
Breaking : रेखा शर्मा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणार

भारताची आशा उदयास आली

अदिती लेडीज युरोपियन टूरचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय आहे. याशिवाय, 2016 मध्ये आयोजित रिओ ऑलिम्पिकमध्ये उतरताच ती सर्वात तरुण गोल्फर बनली. रिओमधील आदितीची कामगिरी फारशी चांगली नव्हती. तिने 41 वे स्थान मिळवले होते. परंतु टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती भारतासाठी मोठी आशा म्हणून उदयास आली. तिने कोणताही गाजावाजा न करता आपला खेळ दाखवत राहीली आणि पदकाच्या अगदी जवळ पोहचली होती.

Tokyo Olympics: गोल्फमध्ये भारताचा झेंडा फडकवणारी आदिती अशोक कोण
Breaking : रेखा शर्मा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणार

आई- वडीलांनी प्रत्येक टप्प्यावर साथ दिली

अदितीच्या आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आईवडिलांना प्रत्येक टप्प्यावर तिला आधार दिला. 2016 मध्ये जेव्हा ती पहिल्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र झाली, तेव्हा तिचे वडील तिची गोल्फ बॅग घेऊन जाताना दिसले. त्याचवेळी, टोकियो ऑलिम्पिकमध्ये आदितीची आई तिच्यासोबत चालताना दिसली. आपली मेहनत आणि आई -वडिलांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे अदिती टोकियोमध्ये चमकली.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com