'अयोध्या हुई हमारी अब मथुरा की बारी'; UP मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थळाचा वाद पेटला Saam Tv
देश विदेश

'अयोध्या हुई हमारी अब मथुरा की बारी'; UP मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थळाचा वाद पेटला

अयोध्या हुई हमारी अब मथुरा की बारी, असा आवाज आता उमटू लागलाय. हा मुद्दा भविष्यकाळात राजकारणाच्या केंद्रस्थानी येईल, असं भाकीत अभ्यासक वर्तवतात.

सोनाली शिंदे

अयोध्या हुई हमारी अब मथुरा की बारी, असा आवाज आता उमटू लागलाय. हा मुद्दा भविष्यकाळात राजकारणाच्या केंद्रस्थानी येईल, असं भाकीत अभ्यासक वर्तवतात. सुप्रीम कोर्टाने अयोध्येत राम मंदिराचा निर्णय दिल्यानंतर तीन दशकं चाललेला हा वाद निवळला. पण आता अयोध्येनंतर मथुरेचा वाद समोर आणला जाऊ लागलाय. उत्तरप्रदेशमध्ये भाजपची सत्ता असून इथले उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी जाहीर भाषणात मथुरा मंदिराचा मुद्दा आणला. आता मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाचा वाद आता मोठा होऊ लागलाय. हा वाद न्यायालयातही पोहोचला.

मथुरेत एकाच परिसरात कृष्ण जन्मभूमी आणि मस्जिद आहेत. मंदिराजवळची ही मस्जिद 17 व्या शतकात बांधलेली आहे. काही हिंदूंचा दावा आहे की मंदिर तोडून तिथे मस्जिद बांधलं होतं. सध्या श्रीकृष्ण जन्मस्थळाची 13.37 एकर जमिनीचा वाद कोर्टात आहे. त्यापैकीच एका जागेवर ही मस्जिद आहे.

हिंदू-मुस्लिम हा वाद सुरु असताना सर्वसामान्य लोक मात्र या वादाच्या विरोधात आहेत. त्यापेक्षा मंदिरात सोयीसुविधा देण्याची मागणी केली जातेय.

हे देखील पहा-

उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत जरी हा मुद्दा मोठा करुन ध्रुवीकरण करण्यात राजकीय पक्षांना यश आलेल नाहीये. पण येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा मुद्दा अधिक मोठा केला जाण्याची शक्यता आहे. अयोध्येच्या मुद्द्यानंतर पुन्हा धार्मिक तेढ वाढू नये, जगण्याचे प्रश्न परत मागे राहू नयेत, अशीच जाणकारांची इच्छा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT