Controversial Ahmedabad Posters Saam Tv News
देश विदेश

अत्याचार अन् सामूहिक बलात्कारावर आळा घालण्यासाठी महिलांना पोलिसांचं अजब सल्ला; पोस्टर व्हायरल

Controversial Ahmedabad Posters: अहमदाबादमध्ये महिलांना रात्री बाहेर न जाण्याचा सल्ला देणारे पोस्टर्स लावले गेले. पोस्टर्सवरून महिलांना बलात्कार टाळण्यासाठी घरातच राहण्याचा इशारा दिला गेला.

Bhagyashree Kamble

  • अहमदाबादमध्ये महिलांना रात्री बाहेर न जाण्याचा सल्ला देणारे पोस्टर्स लावले गेले.

  • पोस्टर्सवरून महिलांना बलात्कार टाळण्यासाठी घरातच राहण्याचा इशारा दिला गेला.

  • सामाजिक संताप आणि विरोधकांकडून टीका.

अहमदाबाद शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी लावले गेलेले काही पोस्टर्स वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 'रात्री उशिरा पार्टीला जाऊ नका, बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो', अशा प्रकारचे संदेश असलेल्या या पोस्टर्समुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पोस्टर्समुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न नव्याने ऐरणीवर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अहमदाबादच्या सोला आणि चांदलोदिया भागात रस्त्याच्या कडेला काही पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्या पोस्टर्समधून महिलांना रात्रीच्या वेळेस बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. हे पोस्टर्स अनेक भागांमध्ये लावण्यात आले आहे. या पोस्टर्सवर विरोधकांनी टीका केली आहे.

या पोस्टर्सवर लिहिले की, 'रात्री उशिरापर्यंत पार्ट्यांमध्ये जाऊ नका. तुमच्यावर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो. तुमच्या मैत्रिणीसोबत अंधार किंवा निर्जनस्थळी जाऊ नका. जर, तिच्यावर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झाला तर?' या पोस्टर्सवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

यानंतर हे पोस्टर्स काढून टाकण्यात आले. पोलीस उपायुक्त नीता देसाई यांनी सांगितलं की, वाहतूक विभागाने केवळ रस्ता सुरक्षेशी संबंधित पोस्टर्स लावले होते. महिला सुरक्षेशी संबंधित पोस्टर्स लावले नव्हते, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. दरम्यान, व्हिजिलन्स ग्रुप नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेनं वाहतूक पोलिसांच्या संमतीशिवाय वादग्रस्त पोस्टर्स बनवून लावले, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, या पोस्टर्समुळे नागरिकांनी रोष आणि विरोधकांनी टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

SCROLL FOR NEXT