Accident News Saam tv
देश विदेश

Accident : चालकाला हॉर्ट अटॅक, कंटेनर गेला कंट्रोल बाहेर, दिसेल त्याला उडवले

Karnataka Accident: कर्नाटकमध्ये कंटेनर चालकाला हार्ट अटॅक आल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या अपघातात एका जणांचा मृत्यू झालाय.

Namdeo Kumbhar

Accident : कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंटेनर चालकाला हार्ट अटॅक आल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. चालकाला हार्ट अटॅक आल्यामुळे कंटेनर अनियंत्रित होऊन रस्त्यावर धावत होता. अनियंत्रित झालेल्या कंटेनरच्या धडकेत भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला, अनेजकण जखमी झाले आहेत. अनेक वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चालकाला छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागला, हार्ट अटॅक आल्यामुळे कंटेनरवरील त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर भरधाव वेगाने रस्त्यावर धावत होता. कंटेनरने अनेक वाहनांना आणि रस्त्यावरील माणसांना धडक दिली. कंटेनरच्या धडकेत ३२ वर्षीय भाजी विक्रेता मोहम्मद अली याचा मृत्यू झाला. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर शाहपूर वरून कुलबर्गीकडे जात होता. जेवरगी बस स्टँडच्या जवळ चालकाला अचानक हॉर्ट अटॅक आला, त्यामुळे वाहनावरील कंट्रोल सुटले. फळविक्रेत्याला चिरडल्यानंतर ऑटो अन् दुचाकी वाहनांनाही जोरदार धडक दिली. त्यानंतर विजेच्या खांबाला धडकल्यानंतर कंटेनर थांबला. कंटेनर चालकाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. पोलिसांनी याप्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवली रेल्वे स्थानकातून राजू पाटील शेकडो मनसैनिकांसह ट्रेनने मुंबईकडे रवाना

मोदी सरकारचं गिफ्ट! ५ टक्के व्याजावर ३ लाखांचं कर्ज; काय आहे सरकारची योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Gold Price Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल; 18, 22 आणि 24 कॅरेट किती रुपयांनी स्वस्त? आताच घ्या जाणून

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT