बोलता बोलता अचनाक थांबले अन् स्टेजपासून दूर गेले; भाषणावेळी अमित ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं?

Amit Thackeray Speech: अमित ठाकरे मनसे विद्यार्थी मेळाव्यात भाषण देताना भावूक झाल्याने काही क्षण ब्लँक झाले आणि भाषण विसरले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा मुंबईत मेळावा पार पडला. यावेळी भाषण करताना अमित ठाकरेसोबत एक विचित्र घटना घडली. विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन भाषण करताना अमित ठाकरे काय बोलायचं होतं तेच विसरले. अमित ठाकरे मेळाव्यात भाषणासाठी उभे राहिले. ते देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीवर बोलत होते. कार्यकर्त्यांना जुने आंदोलनं विसरण्यास सांगितलं आणि नव्यानं नवीन मुद्द्यावर आंदोलन करावेत असं सांगितलं. पण ते बोलता बोलता अचानक मध्येच थांबले. थोडावेळ काय बोलायचं हेच सूचेना. ते ब्लँक झाले आणि मी भाषण विसरलो म्हणत ते स्टेजपासून दूर गेले. त्यामुळे मनसे सैनिकही आवाक् झाले. पण एक 10 मिनिटानंतर अमित ठाकरे परत स्टेजवर आले आणि तडाखेबंद भाषण करत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com