Jammu And Kashmir  Saam Tv
देश विदेश

Jammu And Kashmir : निवडणूक निकलाआधी दहशतवाद्यांचा डाव उधळला; भारतीय लष्कराने केली शस्त्रे आणि स्फोटके जप्त

Indian Army Seizes Dangerous Weapons Explosive In Poonch : दहशतवाद्यांचा जम्मू-काश्मीरमध्ये दहशत माजवण्याचा कट फसलाय. भारतीय लष्कराने धोकादायक शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये दहशत माजवण्याचा कट हाणून पाडलाय. दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त केल्याची माहिती मिळतेय. भारतीय लष्कराच्या रोमियो फोर्सने जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील झुल्लास भागात शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केलाय. शनिवारी ही कारवाई केल्याचं समोर आलंय.

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे शोध सुरू करण्यात आला होता. एका संशयित दहशतवाद्याच्या बॅगमधून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात (Jammu And Kashmir News) आली.

झडतीमध्ये अनेक शस्त्रे आणि स्फोटके सापडली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या वस्तूंमध्ये पाकिस्तानी बनावटीच्या एके ४७ आणि पिस्तुल राउंड आणि आरसीआयईडी, टाइम्ड डिस्ट्रक्शन आयईडी, स्टोव्ह आयईडी, आयईडीसाठी स्फोटके आणि चिनी ग्रेनेड्स यांसारख्या अत्याधुनिक स्फोटकांचा समावेश आहे.

लष्कराने निवेदनात म्हटलंय की, ५ ऑक्टोबर रोजी विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या (Conspiracy Terrorize) आधारे, भारतीय लष्कराच्या रोमियो फोर्सने झुल्लास परिसरात एक मोठी शोध मोहीम सुरू (Indian Army) केली. झडतीदरम्यान एका संशयित दहशतवाद्याची बॅग सापडली. या बॅगमध्ये पाकिस्तानी मूळ एके ४७ आणि पिस्तुलच्या राऊंड आणि आरसीआयईडी, टाइम्ड डिस्ट्रक्शन आयईडी, स्टोव्ह आयईडी, आयईडी आणि चायनीज ग्रेनेडसाठी स्फोटक यांसारखी अत्याधुनिक स्फोटके देखील होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व वस्तू कार्यरत आणि वापरण्यास तयार होत्या. निवडणुका सुरळीत पार पडणे आणि आगामी निवडणूक निकाल पाहता सुरक्षा ग्रीडमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारत भारतीय लष्कराचे हे मोठं यश (Army Seizes Dangerous Weapons) आहे. अजूनही मोहीम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. त्यापूर्वी जम्मूमधील रिंगरोड घरोटा येथे पोलीस आणि सैन्याच्या गस्तीला एक संशयित स्फोटक सापडला होता. संशयित स्फोटके नंतर बॉम्ब निकामी पथकाने नष्ट केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT