Jammu Kashmir Terrorist Attack : सुरक्षा दल दशहशतवाद्यांमध्ये अनंतनागमध्ये धुमश्चक्री; २ जवान शहीद, ३ जखमी

J&K Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील दुर्गम भागात शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत २ जवान शहीद झाले आहेत, तर ३ जण जखमी झाले आहेत.
Jammu Kashmir Terrorist Attack
Jammu Kashmir Terrorist AttackSaam Digital
Published On

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील दुर्गम भागात शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत २ जवान शहीद झाले आहेत, तर ३ जण जखमी झाले आहेत. अहलान गडोले परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांचे जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.या भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती पोलीस आणि सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

दहशतवाद्यांशी दोन हात करताना ५ जवान जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण दोन जवानांना वीरमरण आलं आहे. तीन जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. या चकमकीत दोन स्थानिक नागरिकही जखमी झाल्याची माहिती आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील कोकरनाग भागातील अहलान गडोले येथे घेराबंदी केली आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला, त्याला सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युतर दिलं.

पोलिसांनी शनिवारी कठुआ जिल्ह्यातील ढोक भागात ४ दहशतवाद्यांची छायाचित्र जारी केली होती. दहशतवाद्यांबाबत ठोस माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असं पोलिसांनी जाहीर केले आहे. ८ जुलै रोजी कठुआमध्ये मछेडी येथील जंगल परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या शोध पथकावर हल्ला केला होता. यामध्ये जेसीओसह पाच जवान शहीद झाले होते.

डोडा जिल्ह्यातील देसा जंगल परिसरात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या अधिकाऱ्यासह पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये एका अधिकाऱ्यासह चार जवानांचा मृत्यू झाला होता. भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी डोडाच्या उत्तर भागात ही संयुक्त कारवाई करण्यात येत होती.गेल्या काही दिवसांपासून जम्मूमधील भारत-पाकिस्तान सीमेवर दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बीएसएफने सैन्याच्या संख्येत लक्षणीय वाढ केली आहे. पंजाब-जम्मू आंतरराज्य सीमेवर सीसीटीव्हीही बसवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com