Rahul Gandhi On MP Assembly Election 2023 saam tv
देश विदेश

MP Assembly Election 2023: कर्नाटकच्या विजयाची पुनरावृत्ती मध्य प्रदेशातही होणार, 150 जागा जिंकण्याचा राहुल गांधींचा दावा

कर्नाटकच्या विजयाची पुनरावृत्ती मध्य प्रदेशातही होणार, 150 जागा जिंकण्याचा राहुल गांधींचा दावा

Satish Kengar

Rahul Gandhi On MP Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसमध्ये उत्साहचे वातावरण आहे. या वर्षी होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यांच्या निवडणुकांसाठी पक्षाने नियोजन सुरू केले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनीही सोमवारी दिल्लीत मध्य प्रदेशातील नेत्यांची भेट घेतली. या बैठकीला मध्य प्रदेशचे दोन माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह उपस्थित होते. या बैठकीत खरगे आणि राहुल गांधी यांनी क्षेत्रनिहाय आराखडा तयार करून कोणत्या मुद्द्यांवर पुढे जाता येईल यावर नेत्यांकडून अभिप्राय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

'मध्य प्रदेशात आम्ही 150 हून अधिक जागा जिंकू'

बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले, 'आम्ही फक्त सविस्तर चर्चा केली आहे. कर्नाटकात ज्या प्रकारे आम्ही १३६ जागा जिंकल्या, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात आम्ही १५० हून अधिक जागा जिंकू. मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण १३० जागा आहेत. २०१८ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि सरकार स्थापन केले. मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीमुळे भाजप पुन्हा सत्तेत आली. (Latest Marathi News)

राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काँग्रेस राज्यात आपले स्थान मजबूत करू पाहत आहे. याचे कारण म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) असताना कमलनाथ आणि त्यांच्यात गटबाजी होती. मात्र ते पक्षातूनच बाहेर गेल्याने राज्यात पक्ष आता एकाच नेतृत्वाखाली एकत्र आहे.

कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यात चांगली सामंजस्य पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशसोबतच राजस्थानमध्येही काँग्रेसने निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज दिल्लीत सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांची बैठक बोलावली आहे. यावेळी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार असून अंतर्गत वादाबद्दलही चर्चा होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT