Pradeep Kurulkar News: डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

DRDO Director Pradeep Kurulkar News Update : कुरुलकर यांना आज पुणे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पुणे न्यायालयाने त्यांना १२ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
DRDO - Pradeep Kurulkar
DRDO - Pradeep Kurulkarsaam tv
Published On

>>अक्षय बडवे, साम टीव्ही

Dr. Pradeep Kurulkar remanded in judicial custody : हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्या प्रकरणी अटकेत असलेले डीआरडीओचे (DRDO) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कुरुलकर यांना आज पुणे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पुणे न्यायालयाने त्यांना १२ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक केली होती. त्यानंतरत पुणे सत्र न्यायालयाने त्यांना १५ मे पर्यंत कोठडी सुनावली होती. आता पुन्हा त्यांना 12 जून पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. प्रदीप कुरुलकर यांची वेगवेगळ्या तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे.

कुरुलकर यांनी पाकिस्तानी हेरांना कोणती माहिती आणि कशा प्रकारे पुरवली याची चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून लॅपटॉपसह तीन मोबाईल आणि हार्ड डिस्क जप्त केली आहे. त्यातून त्यांनी देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविल्याचे ‘डीआरडीओ’च्या अहवालातून समोर आले आहे.

DRDO - Pradeep Kurulkar
IPL 2023 Final Scenarios: पाऊस पडला की कोण जिंकणार? चेन्नई की गुजरात? समजून घ्या सामन्याचं समीकरण एकाच क्लिकवर

२०२२ पासून पाकिस्तानी हेरांच्या संपर्कात

कुरुलकर 2022 पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होते. त्यांना महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अधिकृत गोपनीय कायद्यांतर्गत पुण्यातून अटक केली. पाकिस्तानच्या महिला गुप्तचर एजंटने कुरुलकर यांना व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला होता आणि तेव्हापासून ते व्हॉट्सअॅप मेसेज आणि व्हिडिओ कॉलद्वारे सतत तिच्या संपर्कात होते. एटीएस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार चौकशीदरम्यान कुरुलकरने महिलेशी व्हिडिओ चॅटिंग केल्याचे मान्य केले आहे.

कुरुलकर यांना ९ मेपर्यंत कोठडी

चौकशीत कुरुलकर (Pradeep Kurulkar) दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप आणि मोबाईल राज्य दहशतवाद विरोधी पथकातील अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे सोपविण्यात आला होता. याबाबत डीआरडीओच्या दिल्ली मुख्यालयातील कर्नल प्रदीप राणा यांनी मुंबईतील एटीएसच्या काळा चौकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कुरुलकर यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम १९२३ च्या कलमान्वये दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking News)

DRDO - Pradeep Kurulkar
Delhi Girl Killed Case: प्रेमाचा भयानक शेवट! गर्लफ्रेंड घराबाहेर पडताच बॉयफ्रेंडने केलं भयानक कृत्य; खळबळजनक घटनेने दिल्ली हादरली

हेरांच्या भेटी कशा आणि केव्हा घेतल्या?

कुरुलकर यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने हनी ट्रॅपमध्ये अडवल्यानंतर त्यांनी परदेशात पाकिस्तानी हेरांच्या भेटी कशा आणि केव्हा घेतल्या, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. कुरुलकर यांनी कार्यालयीन गोपनीय माहिती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) गुप्तचर यंत्रणेला दिल्याचे तपासात आढळून आले आहे.

आर्थिक फायद्यासाठी दिली गोपनीय माहिती?

कुरुलकर यांनी शासकीय गोपनीय माहिती आर्थिक फायद्यासाठी पाकिस्तानला दिल्याचाही संशय आहे. कुरुलकर देशातील अन्य राज्यांतील काही जणांच्या संपर्कात असल्याची मिळाली आहे. ते पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेरांशी संपर्क साधताना कोणत्या उपकरणांचा वापर करत होते, या दृष्टीने एटीएसकडून तपास करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com