IPL 2023 Final Scenarios: पाऊस पडला की कोण जिंकणार? चेन्नई की गुजरात? समजून घ्या सामन्याचं समीकरण एकाच क्लिकवर

CSK vs GT Final Weather Update: समजनू घ्या कसं असेल सामन्याचं समीकरण.
ms dhoni and hardik pandya
ms dhoni and hardik pandya saam tv
Published On

CSK VS GT,IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार होता. मात्र पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. २८ मे रोजी पावसाने अहमदाबादमध्ये जोरदार बॅटिंग केली.

आधी क्लोसिंग सेरेमनी, मग टॉस आणि शेवटी हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र आजही पाऊस पडल्यास सामन्याचा निकाल कसा लावला जाईल? किती ओव्हर्स कमी केल्या जातील? समजनू घ्या कसं असेल सामन्याचं समीकरण.

ms dhoni and hardik pandya
CSK vs GT, IPL Final 2023: ठरलं तर! गुजरातच जिंकणार फायनल, सामन्यापूर्वीच हार्दिकने वाढवलं धोनीचं टेन्शन

आजही पाऊस पडण्याची शक्यता

AccuWeather नुसार, आज म्हणजे रिझर्व्ह डेच्या दिवशी देखील पाऊस पडू शकतो. मात्र सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता केवळ ३ टक्के आहे. मात्र ढगाळ वातावरण असल्याची शक्यता ३४ टक्के आहे. तर ताशी ११ किमी वेगाने वारे वाहू शकतात. याशिवाय आर्द्रता ५५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, तापमान ३२ अंशांच्या आसपास असेल.

पाऊस पुन्हा जोरदार बॅटिंग करणार का? की चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज सामना सुरू असताना पाऊस पडण्याची शक्यता नहीच्या बरोबर आहे. मात्र सामन्यापूर्वी पाऊस पडू शकतो. त्यामुळे सामना सुरू होण्यास उशिर होऊ शकतो. (Latest sports updates)

ms dhoni and hardik pandya
CSK vs GT,IPL Final 2023: ..तर तिकीट असूनही मिळणार नाही फायनल सामन्यात एन्ट्री

सामना उशीरा सुरू झाल्यास..

हा सामना नियोजित वेळेनुसार आज संध्याकाळी ७:30 वाजता सुरू होणार आहे. जर पाऊस पडुनही सामना ९:35 च्या आत सुरू झाला तर, क्रिकेट चाहत्यांना पुर्ण २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळेल.

५ षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफ टाइम : जर पाऊस उशिरापर्यंत सुरूच राहिला तर बीसीसीआयसमोर ५-५ षटकांचा सामना खेळवण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. यासाठी सामना १२:०६ पर्यंत सुरु होणं गरजेचं आहे.

सुपर ओव्हरसाठी कट ऑफ टाइम : जर ५-५ षटकांचा सामना होऊ शकला नाही. तर सुपर ओव्हरसाठी १:२० पर्यंत वाट पाहिली जाईल.

पावसामुळे सामना धुतला गेल्यास असा लागेल निकाल: जर हा सामना पावसामुळे पूर्णपणे रद्द केला गेला तर, साखळी फेरीत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल असणाऱ्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. असे झाल्यास २० पॉईंट्ससह अव्वल असलेला गुजरात टायटन्स संघ विजेता ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com