Dhanbad News: झारखंडच्या (Jharkhand) धनबाद जिल्ह्यातील गोमो-धनबाद रेल्वे विभागाच्या झारखोर फाटकजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. विजेच्या संपर्कात आल्याने सहा कंत्राटी कामगारांचा जळून मृत्यू झाला आहे. या भयंकर दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच धनबाद रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सर्व मजूर निशितपूर रेल्वे गेटजवळ खांब लावत होते, त्याचवेळी ही दुर्घटना झाल्याचे असे सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनबाद (Dhanbad) रेल्वे विभागाच्या हावडा-नवी दिल्ली मार्गावरील धनबाद-गोमो स्थानकादरम्यान निश्चितपूर रेल्वे गेटजवळ खांब उभारण्याचे काम सुरू होते. पोल बसवताना रेल्वेच्या 25000 व्होल्टच्या हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्याने रेल्वेच्या मजूरांना आपला जीव गमवावा लागला.
अपघात एवढा भीषण होता की आठ जणांचा जागीच कोळसा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
माहिती मिळताच डीआरएम कमल किशोर सिन्हा आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्व जण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद व्यतिरिक्त झारखंडमधील पलामू आणि लातेहार येथील रहिवासी होते.
मृतांमध्ये गोविंद सिंग, सुरेश मिस्त्री, श्याम भुईया, श्यामदेव सिंग, संजय राम आणि अन्य एकाचा समावेश आहे. या घटनेसाठी लोक रेल्वे कंत्राटदार आणि प्रशासनाला जबाबदार धरत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळेच एवढी मोठी दुर्घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (Jharkhand News )
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.