Nashik Crime News: नाशिक पुन्‍हा हादरले..मुंबईहून आई– वडील भेटायला आले, दरवाजा उघडताच बसला धक्‍का

नाशिक पुन्‍हा हादरले..भररस्‍त्‍यावर वार करत एकाची हत्‍या
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam tv

तबरेज शेख

नाशिक : नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीने डोकं वर काढले आहे. यात आज खुनाच्या घटनेने (Nashik) नाशिक शहर पुन्हा हादरले असून भररस्‍त्‍यात इसमावर (Crime News) चाकूने वार करत हत्‍या केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

Nashik Crime News
Trimbakeshwar News: त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्‍वस्‍त पदासाठी नाशिकपर्यंत कार्यक्षेत्र; लवकरच नवीन विश्वस्त मंडळ

नाशिकरोड परिसरातील जेलरोड दुर्गा मंदिरासमोर एकाचा विळ्याने आणि काचेने वार करत हत्या करण्यात आली आहे. प्रवीण मधुकर दिवेकर (वय ४३, रा. हेतल हाउसिंग सोसायटी, नाशिक) हे पूर्वी मुंबई येथे राहत होते. कौटुंबिक वादामुळे १५ ते २० दिवसांपूर्वी जेलरोड येथे एकटेच राहत होते. गेल्या चार महिन्यांपूर्वी त्यांचा मुलाने याच कारणाने मुंबई येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांकडून समजते.

Nashik Crime News
Girish Mahajan: स्‍वतःच्‍या स्वार्थामुळे खडसेंचा जावाई तुरुंगात; मंत्री गिरीश महाजन यांची टीका

भेटायला आलेल्‍या आई– वडीलांना बसला धक्‍का

प्रवीण दिवेकर यांनी जेवल्यानंतर फोनद्वारे नातेवाईकांना संपर्क साधून खुशाली देखील विचारली होती. सकाळी मुंबईहून आई- वडील नाशिकला खरेदीसाठी आल्यावर मुलाला भेटण्यासाठी मुलाकडे घरी आले. तेव्हा प्रवीण दिवेकर हे जमिनीवर रक्तभंबाळ अवस्थेत पडलेले आढळून आले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक चौकशी केली.

खूनामागील कारण अद्याप अस्पष्ट

भररस्‍त्‍यात झालेल्‍या या घटनेने नाशिक शहर हादरले आहे. दिवेकर यांच्‍यावर हल्‍ला करणारे तेथून फरार झाले असून खूनामागील कारण अद्याप अस्‍पष्‍ट आहे. पोलिसांनी (Police) पंचनामा केला असून उपनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे अज्ञात मारेकरींचा शोध सुरू आहे. अशी माहिती उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com