Girish Mahajan: स्‍वतःच्‍या स्वार्थामुळे खडसेंचा जावाई तुरुंगात; मंत्री गिरीश महाजन यांची टीका

स्‍वतःच्‍या स्वार्थामुळे खडसेंचा जावाई तुरुंगात; मंत्री गिरीश महाजन यांची टीका
Girish Mahajan Eknath Khadse
Girish Mahajan Eknath KhadseSaam tv
Published On

जळगाव : माझ्यावर ‘मकोका’अंतर्गत खोटी कारवाई केल्याचे खुद्द खडसेंनीच मान्य केले. त्यांच्यावर मात्र (Jalgaon News) कायदेशीरपणे कारवाई झाली आहे. त्यांच्या स्वार्थमुळे त्यांचा जावाई दोन वर्षांपासून तुरुंगात असल्याची खंत मलाही आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली. (Maharashtra News)

Girish Mahajan Eknath Khadse
Dhule Accident News: पायी जाणाऱ्या इंजिनीअर तरुणाला वाहनाची धडक; एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबाचा आक्रोश

दोन दिवसांपूर्वी (Eknath Khadse) एकनाथ खडसेंनी ‘महाजनांनी ईडी लावली म्हणून आम्ही त्यांच्यावर मोका लावला’ असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गिरीश महाजन बोलत होते. भाजपच्या बैठकीनंतर पत्रकारांनी विचारले असते श्री. महाजन म्हणाले, खडसेंवर आम्ही कुठलाही आरोप केला नव्हता. अंजली दमानियांच्या आरोपावर चौकशी होऊन त्यात तथ्य बाहेर आले. म्हणून त्यांच्या जावयाला तुरुंगात जावे लागले. कोर्टाने दिलासा दिला म्हणून त्यांचे कुटुंबीय बाहेर आहेत. अन्यथा तेदेखील आत असते. त्यांच्यावरील कारवाई तर त्यांनी केलेल्या कृत्यामुळे होती. त्यांचा जावाई चांगला माणूस आहे, पण एकनाथ खडसेंच्या स्वार्थामुळे तो आत असल्याचे आम्हालाही दु:ख आहे, असा टोला महाजनांनी लगावला.

Girish Mahajan Eknath Khadse
Bhandara News: रुग्णालयात दाखल पतीचा डबा करताना घडले अघटीत; गॅस लिकेजमुळे घराला आग

मंगेश चव्हाणांकडूनही टीका

दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांनीही आमचे नेते गिरीश महाजनांवरील टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा देताना खडसेंवर शेलक्या भाषेत टीका केली. खडसे पदावर होते तेव्हा सर्वांनीच त्यांचा मान सन्मान केला. आता मंत्री म्हणून महाजन, गुलाबराव पाटील चांगले काम करीत आहेत, तर त्यांच्यावर विनाकारण टिका करुन ते चर्चेत राहतात. खडसे ही राजकारणातील विकृती असून त्यांनी केवळ इतरांना डॉमिनेट करण्याचेच काम केले, असे चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com