शुभम देशमुख, साम टीव्ही
Bhandara News: रुग्णालयात उपचारासाठी दाखल पतीला असलेल्या पतीला टिफिन घेऊन जाण्यासाठी पत्नीने गॅस पेटवला. मात्र, अचानक भयानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केलं आणि संपूर्ण घर जळून खाक झालं. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. अंगावर काटा आणणारी ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातल्या मोहरणा गावात रविवारी (२८ मे) पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)
भाऊराव भिवा दिघोरे असे घटनेतील पीडित घरमालकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, घटनेतील पीडित घरमालक (Bhandara News) भाऊराव दिघोरे अल्पभूधारक शेतकरी आहे. त्यांनी शासनाच्या उज्वला गॅस योजनेअंतर्गत घरगुती स्वयंपाकासाठी इंडेन कंपनीचे गॅस कनेक्शन घेतले होते.
भाऊराव यांची प्रकृती मागील ३-४ महिन्यापासून बिघडल्याने त्यांना उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवारी सकाळच्या सुमारास भाऊराव यांची पत्नी वनिता पतीला भेटण्यासाठी रुग्णालयात जाणार होती. रुग्णालयात जाताना पतीसाठी टिफिन घेऊन जाण्याचे तिने ठरविले होते. (Breaking Marathi News)
सकाळच्या सुमारास राहत्या घरातील गॅस सिलेंडरवर स्वयंपाक करण्यासाठी तिने गॅस पेटवला. मात्र सिलेंडर मधून गॅसची गळती होत असल्याने अचानक पेट घेतला. लगेच वनिताने या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत घरातील जवळपास ३५ हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले.
या घटनेची माहिती मोहरना क्षेत्राचे पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांना होताच त्यांनी तात्काळ त्यांच्या घरी भेट देत स्वखर्चातुन ताडपत्री भेट दिली. यावेळी मोहरणाचे सरपंच निलेश बोरकर, माजी पोलिस पाटील दादाजी राउत, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रभाकर चौधरी, बबूल राउत, सुरेखा बगमारे, मारोती दिघोरे, लाला बगमारे, नरेंद्र बगमारे, पांडुरंग चौधरी, रितेश देसाई, मनोहार दिघोरे, वैभव नागोसे, मिलिंद रामटेके यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे संबंधित गॅस कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्याची गावकऱ्यांसह पीडित कुटुंबीयांनी केली आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.