Pimpri Chinchwad Crime: जिथे घातली दहशत तिथेच उतरवला माज; तळेगावात पोलिसांनी काढली किटक टोळीची धिंड

Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात धुमाकूळ घालणाऱ्या किटक टोळीचा चांगलाच बंदोबस्त केलाय.
Pimpri Chinchwad police arrested the goons of the Kitak gang
Pimpri Chinchwad police arrested the goons of the Kitak gang Saam TV

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. चोरी, खंडणी तसेच नागरिकांच्या मनात दहशत तयार करण्यासाठी भररस्त्यात गुंडांच्या टोळ्या धुमाकूळ घालत आहेत. या टोळक्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसही मोहिमा राबवत आहे. अशातच पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात धुमाकूळ घालणाऱ्या किटक टोळीचा चांगलाच बंदोबस्त केलाय. (Latest Marathi News)

Pimpri Chinchwad police arrested the goons of the Kitak gang
Uttar Pradesh Crime News: बुरखा घालून गर्लफ्रेंडला भेटायला गेला; मुलं चोरणारा समजून लोकांनी बदडलं

भरदिवसा गोंधळ घालत दहशत निर्माण करणाऱ्या किटक टोळीला पोलिसांनी (Police) अटक केली. इतकंच नाही तर, या गुंडांनी घातलेली दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांची तळेगाव दाभाडे येथे धिंड काढली. किटक भालेराव, वैभव राजाराम विटे विशाल शिवाजी गुंजाळ प्रदीप वाघमारे, रुतिक मेटकरी, अशी अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.

टोळीचा म्होरक्या किटक भालेराव याने त्याच्या साथीदारांसह तळेगाव दाभाडे (Pimpri Chinchwad) येथे भरदिवसा मुलींची नावे घेऊन गल्लीमध्ये आरडाओरडा केला होता. इतकंच नाही तर, त्याने महिलेला मारहाण करून विनयभंग देखील केला. महिलेच्या दीराला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. लोकांना धमकावून दहशत केली.

Pimpri Chinchwad police arrested the goons of the Kitak gang
Ambernath Crime News: अंबरनाथ हादरलं! मूलबाळ होत नसल्यानं पतीचं पत्नीसोबत भयानक कृत्य

गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने आरोपींचा माग काढून अटक केली. गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींना घटनास्थळी नेले. आरोपींची धिंड काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

किटक टोळीचा प्रमुख असलेला किटक भालेराव याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दरोडा, विनयभंग, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करून धमकी देणे व दहशत निर्माण करणे असे दहा गुन्हे दाखल आहेत.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com